Ticker

6/recent/ticker-posts

किनवट मध्ये आज 2 बाधितांची भर


.किनवट मध्ये आज 2 बाधितांची भर


किनवट / तालुका प्रतिनिधी  : सोमवार ता.26 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार आज   


एँटिजेन तपासणीद्वारे तालुक्यात 2 बाधितांची भर पडली आहे. 

       

         त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 585 झाली आहे. 

आजपर्यंत 502 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. 

आजचे 2 बाधित हे किनवट मधील 1 व गोंडजेवली येथील 1 आहेत.

            

     रविवार (ता.25) रोजी गोकुंदा येथील 1 व्यक्ती एँटीजेन टेस्टद्वारे बाधित आढळला होता.

     
      बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 5, कोविड केअर सेंटर,

 किनवट येथे 14 व होम क्वारंटाईन 12 अशा एकूण 

31 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये,

 शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, 
असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अब्दुल नासीर अब्दुल बारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याचा कोरोना विषयी संक्षिप्त अहवा

आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 757,

आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-634,

आज घेतलेले स्वॅब - 0,

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,



स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 



ऍन्टिजन टेस्ट- 24,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 2,

निगेटिव्ह अहवाल- 22,



आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-2,



आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -585, 



रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 502,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-19 ( 12 होम क्वारंटाईन)