Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर



किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर

किनवट / तालुका प्रतिनिधी  : सोमवार 12 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यात 5  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.

 यात  आरटीपीसीआर द्वारे 1 व  एँटिजेन किट्स तपासणीद्वारे 4  अहवालाचा समावेश आहे. 
                

त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 541 झाली आहे. आजपर्यंत 468 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. 

आज किनवट (नागरी भाग ) 1, गोकुंदा 3 व बोधडी 1 अशा एकूण 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
         

  बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर, किनवट 

येथे 9 व होम क्वारंटाईन 25 अशा एकूण 41 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये

शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. 

उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 12/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता


आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 720,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-603,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या-1,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजन टेस्ट-10,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 4,
निगेटिव्ह अहवाल -6,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-5,

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -541, 


रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-468,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16 (25 होम क्वारंटाईन)