Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज 7 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी,5 बाधितांची भर



किनवटमध्ये आज 7 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी,5 बाधितांची भर

किनवट / तालुका प्रतिनिधी  : बुधवार 14 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या 

कोरोना अहवालानुसार तालुक्यात आज 7 व्यक्ती औषधोपचारानंतर कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. आज 5 व्यक्तीचा अहवाल 

बाधित आला नाही. यापैकी 1 आरटीपीसीआर व 4 ऍटिजेन टेस्टद्वारे बाधित आढळले आहेत.
               

 त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 546 झाली आहे. 

आजपर्यंत 476 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. 

बाधितांपैकी किनवट शहर 3 व मांडवी 2 असे एकूण 5 पॉझिटिव्ह अहवाल आहेत.
           

बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 

9 व होम क्वारंटाईन 18 अशा एकूण 34 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 14/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता


आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 725,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-607
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या-1
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजन टेस्ट- 48,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-4,
निगेटिव्ह अहवाल -44,

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -546, 
आज सुटी दिलेले - 7,


रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-456,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16 (18 होम क्वारंटाईन)