Ticker

6/recent/ticker-posts

⚫ *हाथरस घटनेचा तीव्र निषेध!* 🔴 *अजून किती खैरलांजी? अजून किती हाथरस?*


⚫ *हाथरस घटनेचा तीव्र निषेध!* 
🔴 *अजून किती खैरलांजी? अजून किती हाथरस?* 

लोकायत, अभिव्यक्ती, मानव मुक्ती मिशन संघटना आणि इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप आयोजित

✊🏿 *वैयक्तिक निषेध*
✊🏾 *#DalitLivesMatter*

◆ आज, *30 सप्टेंबर* 2020
◆ *संध्या. 6.30 ते 7.30 वा.* 
◆ *ठिकाण:* गूडलक चौक, FC रोड, पुणे.

😷 कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन 6 फुटाचे शारीरिक अंतर (physical distancing) राखून, मास्क लावून व सर्व नियम पाळून आम्ही सहभागी झालो होत.

🔖 तसेच सोबत  निषेधाचे पोस्टर हातात घेऊन निदर्शने करण्यात आले. 

मित्र-मैत्रिणींनो, 
खैरलांजी हत्याकांडाला कालच म्हणजे 29 सप्टेंबरला 14 वर्ष पूर्ण झाली. न्यायाची प्रतिक्षा अजूनही चालूच आहे. या हत्याकांडाच्या स्मरणदिनीच, काल उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार पीडितेचाही मृत्यू झाला. 
14 सप्टेंबरला सदर 20 वर्षीय दलित मुलीवर सवर्ण जातीतील 4 जणांनी बलात्कार केला. तिने यावर काही बोलू नये, कुठे तक्रार देवू नये म्हणून तिची जीभ कापली आणि तिचा पाठीचा कणाही मोडला. 14 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी हॉस्पिटलमध्ये काल तिचा मृत्यू झाला. पोलीसांनी तिच्या घरच्यांच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने तिच्या प्रेताचा दाहसंस्कारही उरकून टाकला.  
अशा अमानुष घटना वाढतच आहेत. भारतात रोज 6 दलित महिलांवर बलात्कार होतो. कितीजणींना न्याय मिळतो? बहुदा कुणालाच नाही.
*आपण कधीपर्यंत हे सर्व सहन करणार?* 
या घटनेतून उत्तर प्रदेश सरकारचा व समाजाचा पितृसत्ताक व जातीयवादी विकृत चेहरा परत एकदा समोर आलेला आहे.
*न्यायासाठी-समतेसाठी !*
या अन्यायांविरोधात एकत्र येऊन आवाज उठवणे ही माणूस म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जर आज आपण शांत बसलो तर यापेक्षाही वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल.
 *चला, अशा घटनांसाठी जबाबदार मग ते सरकार असो किंवा समाज, प्रत्येकाला जाब विचारूया, पुरुषसत्ताकता-जातीयवाद यांच्या विरोधात संघटित होऊन लढा देवूया.* 
आशा प्रकारचे पत्रके काढुन 
इनक्रेडिबल समाजसेवक गृप 
लोकायत अभिव्यक्ती, मानव मुक्ती मिशन संघटनाचे असलम इसाक बागवान, सचिन आल्हाट ,शाहिन सिंदकी,शानू पठाण,साहिल मणियार,अमोल शेरेकर,
कबीर शेख,शैलेश,अनिल सिंग, (एन ए पी एम) राजेंद्र भाळकर, (हम भारत के लोग) विजय विरकर,(लोकायतचे)नीरज शहा व सर्व पदाधिकारी यांनी श्रध्दांजली अर्पण करून निदर्शने केली. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳