किनवट ता.प्र दि १० आदिलाबाद चे खासदार सोयम बापुराव यांनी
आज देशाचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना नंदिग्राम एक्सप्रेस व कृष्णा एक्सप्रेस ह्या रेल्वे गाड्या सुरु करण्या संबधी दिल्ली येथे निवेदन दिले
देशात व राज्यात अनलॉक ५ सुरु झाले आहे याचा अर्थ असा होतो कि कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जे लॉकडाऊन मुळे जनजिवन विस्कळीत झाले होते ते आता
पुर्वपदावर येत आहे या अणुषंगाने राज्याच्या विविध भागात रेल्वेसेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
परंतु किनवट आदिलाबाद मार्गावर एक रेल्वे सुरु करण्याचे आता पर्यंत घोषीत झाले नसल्याने या
परिसरातील नागरीकांना अनंत अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
आजच्या स्थितीत किनवट व परिसरातुन राज्यात देशात कोठे ही प्रवास करायचे असल्यास खाजगी वाहन घेऊनच प्रवास करावा लागतो त्यामुळे हे खुप खर्चिक झाले आहे
अशा स्थितीत किनवट व परिसरातील रेलसेवा पुन्हा सुरु करण्या करिता येथिल लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करण्यासंबधी नागरीकांनी विनंती केली
परंतु महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींना रेल्वे प्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु या संबधी जेव्हा आदिलाबाद चे खासदार सोयम बापुराव यांना नागरीकांनी दुरध्वनी वरुन समस्या सोडवण्यासंबधी मागणी केली
तेव्हा त्यांनी तत्काळ स्वरुपात दखल घेत आदिलाबाद, किनवट करिता रेल्वे सुरु करण्यासंबधी निवेदन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना दिले आहे. व रेल्वे मंत्री यांनी त्यांना याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे रेल्वे सेवा सुरु होण्यासंबधी नागरीकांच्या आशा पल्लावित झाल्या आहेत.
आदिलाबाद, किनवट या मार्गावर रेल्वे सेवा सुरु व्हावी याकरिता सर्वपक्षिय पदाधिका-यांनी पुढाकार घेतला होता
यात राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रकाश राठोड, कॉग्रेस चे के.मुर्ती, भाजपा चे संदिप केंद्रे, रा.कॉ चे कचरु जोशी, मनोज तिरमनवार यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहे याच प्रयत्नांची फळश्रुती म्हणून आज दिल्ली स्थित
भाजपा चे जिल्हाध्यक्ष पायल शंकर व शेख जाफर चिखलिकर यांच्या पुढाकाराने खा.सोयम बापुराव यांनी आदिलाबाद, किनवट मार्गावरील प्रमुख दोन गाड्या ट्रेन नं. ११४०१/२ नंदिग्राम एक्सप्रेस जि नागपुर ते मुंबई अशी धावते व ट्रेन
नं १७४०५/०६ कृष्णा एक्सप्रेस जी आदिलाबाद ते तिरुपती अशी धावते ह्या तत्काळ स्वरुपात सुरु करण्याची मागणी केली आहे यामुळे या मार्गावरील नागरीकांच्या रेल्वे सेवा संबधी आशा पल्लवित झाल्या आहेत.