दिशा समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल मारोती सुंकलवाड यांचा शिक्षण विभागाच्यावतीने सत्कार
किनवट / तालुका प्रतिनिधी : येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती कानबाजी सुंकलवाड यांची
नांदेड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती ( दिशा ) वर नियुक्ती झाल्या बद्दल
गट शिक्षणाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण, डोंगरी, आदिवासी , अतिदुर्गम भागातील वाडी- तांडा, पाड्या - गुड्यात भटकंती केल्याने तेथील समस्येची जाण असलेले आपले खंदे समर्थक म्हणून
सामाजिक कार्यकर्ते मारोती कानबाजी सुंकलवाड यांची दिशा समितीवर नियुक्ती करण्याची शिफारस खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रिय ग्राम विकास विभागाकडे केली होती.
त्यानुसार गठीत समिती केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभाग संकेस्थळा ( rural.nic.in) वरील 17 व्या लोकसभेची दिशा समिती प्रदर्शित केली. त्यावरून मारोती कानबाजी सुंकलवाड यांची
नांदेड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती ( डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट को-ऑर्डिनेशन अँड मॉनिटरिंग कमिटी - DISHA - दिशा )
वर अनुसूचित जाती प्रवर्गातून अशासकीय सदस्यपदी नियुक्ती केल्याचा आदेश दिशा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
यांनी दि. 28 सप्टेंबर 2020 रोजी पारीत केला आहे.
या नियुक्ती बद्दल गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, केंद्र प्रमुख प्रकाश होळकर, बी.व्ही.थगनारे, संजय कांबळे, अशोक नेवळे, संतोष बंपलवार, सचिन चव्हाण, कृष्णकांत सुंकलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती
राम बुसमवार यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बाबूराव इब्बितदार यांनी आभार मानले.
सत्काराला उत्तर देतांना सुंकलवाड म्हणाले, या समिती अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, कृषी, पीक विमा, अंत्योदय, स्वच्छता मिशन
रोजगार गॅरंटी, सर्व शिक्षा अभियान एकात्मिक
बालविकास प्रकल्प, सामाजिक न्याय व आदिवासी विकास योजना आदी 43 मुख्य विषयावर समन्वय व सनियंत्रणाची जबाबदारी आहे
खासदार हेमंत भाऊंनी दिलेल्या संधीतून जिल्ह्याच्या ग्राम विकासाला गती देण्यासाठी तसेच आमदार भीमराव केराम यांच्या सहकार्यातून
आदिवासींच्या विकासाला चालना देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देतो