पुणे-(नितीन कालेकर)-🇮🇳न्याय आणी हक्क अभियान.
इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे आज २१६ मंगळवार पेठ येथील दलित व अल्पसंख्याक
महिला आणि येथील नागरिकांना सरकार कडुन मिळणारे विविध योजना तसेच अल्पसंख्याक
महिला बचत गट तसेच महिला सबलिकरण आणी या साठी लागणारे कागदपत्र कसे तयार करून घ्यावे व अल्पसंख्याक महिलांनी गृह
उध्योग कसा सुरु करावा, मार्केटिंग कसे करावे याच्या माहितीच्या शिबिराचे आयोजन इनक्रेडिबल समाजसेवक गृप रूग्न सेवा पुणे
शहर अध्यक्ष नासिर शेख यांनी आयोजनाची जबाबदारी चोख पणे पार पाडली.
यावेळी येथील नागरीकांना इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, मार्गदर्शक इब्रिहिम खान यांनी मार्गदर्शन केले,
कार्यक्रमचे सुत्र संचालन कबिर शेख यांनी केले. 💎
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान.विणा कदम यांनी भुषविले व आभार प्रकट नासिर शेख यांनी केले.
या आभियानास मंगळवार पेठेतील महिलांनी आणी जनतेनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.
यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे
पदाधिकारी राजू सय्यद, वसिम शेख, शानु पठाण, शकिल शेख, मुन्ना अंन्सारी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 🛑🛑🛑
✊✊✊✊✊✊✊✊✊✊