सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटूंबातील एक महिला गेली वाहुन...
किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा येथिल घटना....
किनवट (तालुका प्रतिनिधी) गौतम कांबळे,
यवतमाळ जिल्ह्यातून सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटूंब पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने संतोष कुमार व
त्याच्या दोन मुली पाण्याच्या प्रवाहातून बाहेर निघाल्या तर ममता कुमार ही चाळीश वर्षाची महिला(आई) पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची
दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा येथे दिनांक १० आक्टोबर २०२० रोजी सायंकाळी साडे चार वाजल्याच्या सुमारास घडली आहे.
झारखंड राज्यातील संतोष कुमार हे यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये कलर्क या पदावर कार्यरत होते, ते आज नांदेड जिल्ह्यातील
किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आले असता धबधब्याच्या वरील बाजूस सेल्फी काढण्यासाठी नदीमध्ये गेले होते
अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने संतोष कुमार (पती) ममता कुमार (पत्नी) व दोन मुलीसह हे
नदीमध्ये अडकले असता त्या पाण्याच्या प्रवाहातून या पर्यटक कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी मुरली येथिल संतोष राठोड वय २६ वर्ष या तरूणाने शर्यतीचे पर्यत्न करत बाहेर काढत असताना ममता कुमार (पत्नी) वय ४०
वर्ष ही माहिला त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना विदर्भातील उमरखेड मुरली साईट कडून घडली आहे.
इस्लापुर येथिल सहस्त्रकुंड धबधबा येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीसाना माहिती कळताच साळवे,राचेलवार, गंगुबाई नार्तावार,यांनी विदर्भ साईटकडे जाऊन शोधाशोध केली
मात्र अद्याप पर्यत्न पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह मिळून आला नाही,
हे पर्यटक कुटूंब झारखंड राज्यातील असुन यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये कलर्क या पदावर कार्यरत असल्याची प्राथमीक माहिती मिळाली आहे,
सदरील या घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किणगे व पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे व गोपनीय शाखेचे रामेश्वर आलेवार,यांना मिळताच यांनी देखील
सहस्त्रकुंड धबधबा येथे जाहुन प्रत्यक्षपणे पहाणी केली व शोधाशोध केली.
उमरखेडचे तहसीलदार यांना यांना या घटनेची माहिती मिळताच या घटनेतील महिलेचा शोध घेण्यासाठी यवतमाळ येथून विशेष पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांकडून मिळाली आहे.