Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा चित्रपट कामगार 'जिल्हाध्यक्ष' पदी 'लक्ष्मिकांत मुंडे'


लक्ष्मिकांत मुंडे हे किनवट तालूक्यातिल प्रधानसांगवी या छोट्याश्या दुर्गम खेड्यातील तरूण कलाकार.ज्याचं महाराष्ट्राच्या नकाशावर नाव ही दिसत नाही...

पण या छोट्याश्या खेड्यातून आज नावलौकीक मिळवत आणि महत्वाचे जिल्ह्याचे पद मिळवत त्यांनी आपल्या भागाचे नाव सार्थ केले आहे.


लक्ष्मिकांत मुंडेंच्या अभिनयाची सुरवात त्यांच्या महाविद्यालयातून बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथून झाले 

असून ते वेगवेगळ्या कलाप्रकारातून अस्सल अभिनय, नृत्य आणि दिग्दर्शनातून ते आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली.


पुढे मायानगरी मुंबई त्यांना आपल्याकडे खेचते...तिथे पराकोटीचा संघर्ष करत..प्रसंगी उपाशीही ते अभिनयाच्या वेगवेगळ्या वाटा 

धुंडाळतात...वेगवेगळ्या चित्रपटातून हळूहळू प्रोडक्शन चा भाग बनतात...'घर दोघांच' आणि ' हरी ओम विठ्ठला' सारख्या मोठ्या मराठी 

चित्रपटात मकरंद अनासपूरे यांच्या सोबत कामही करतात...

पुढे मराठी अल्बम,गुजराती क्राईम डायरी,मराठी हींदी मालिकांचाही भाग बनतात. 

अनेक नृत्य-नाट्य स्पर्धांचे विजेते लक्ष्मिकांत मुंबईतही आपली जादू कायम ठेवली .

पुढे अचानक पॅरेलिसेस च्या अटॅकने त्यांना मुंबई सोडावी लागते.

आणि त्यांच्या अभिनयाला खिळ बसते.पण ते गावाकडे येऊनही आपली हिंमत सोडत नाहीत.


किनवट-माहूर" हा दुर्गम-डोंगरी-अदिवासी भाग आहे तिथे चित्रपट निर्मितीचे लोन पसरले पाहीजे". 

या समिकरणालाच जीवंत करत चित्रपट "लोका-ईला" या बंजारी भाषिक चित्रपटातून ते कम बॅक करतात. 

हे ही नसे थोडके. मित्रहो, चित्रपट 'लोका ईला' नंतर लेखक- गीतकार "भोला-मिलींद" या गोडजोडी 

सोबत मुंडे यांनी "सार फिल्म प्रोडक्शन" ची स्थापणा केली.ज्याच्या मध्यमातून लघुचित्रपट "पंख", व आगामी लघुचित्रपट "अव्यक्त"(Antold) हे घेऊन येत आहेत.तसेच सारंगी, 

असमंजस, तुझ्या विना आणि सफर प्रेमाची असे मोठे सिनीमे ही पुढील त्यांची ओळख महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी असेल.


माहूर- किनवटच्या या हुरहून्नरी अभिनेत्याने केवळ अभिनय किंवा चित्रपटातच नव्हे तर पत्रकारीता- व प्रसार माध्यमांतून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे 

आणि त्यामुळेच त्यांच्या गुणवत्तेला सार्थ अशी त्यांची आज भाजप चित्रपट आघाडीचे जिल्हाध्यक्ष ही उपाधी त्यांना मिळाली आहे.


खरं तर दुर्लक्षित व उपेक्षित ठरलेल्या 'माहूर-किनवट' या क्षेत्रात लक्ष्मिकांत मुंडे सारख्या कलाकाराने घेतलेली ही भरारी केवळ 

कौतुकास्पदच नाही तर अभिमानास्पदही आहे.
भाजपा चित्रपट आघाडी च्या जिल्हाध्यक्ष पदी निवडीबद्दल त्यांचे सर्व स्थरातून