Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता ९ वी ते १२ वीतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मिळणार मुंबईतील समुपदेशकांचे मार्गदर्शन ; किनवट तालुक्यातील सर्वांनी लाभ घ्यावा- गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने



इयत्ता ९ वी ते १२ वीतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मिळणार मुंबईतील समुपदेशकांचे मार्गदर्शन ; किनवट तालुक्यातील सर्वांनी लाभ घ्यावा
- गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने

 : किनवट तालुक्यातील इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या 

पालकांना करियर विषयी  मुंबई येथील समुपदेशक  स्मिता शिपूरकर व जयवंत कुलकर्णी  यांचे मार्गदर्शन दिनांक 5 ते 8 ऑक्टोबर 2020 या दरम्यान मिळणार आहे. या संधीचा लाभ किनवट तालुक्यातील विद्यार्थी व 


पालकांनी घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले आहे.
                जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड,शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावी आयुष्यात करिअर कोणते निवडावे, दहावी - बारावी नंतर 

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने महाकरियर पोर्टल डॉट कॉम हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या महाकरियर पोर्टल मध्ये लॉगिन कसे करावे याचे तांत्रिक ज्ञान आणि आपल्या 

अभिरुची नुसार आपण कोणते करिअर निवडले पाहिजे, करिअर निवडीसाठी कोण कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, ते कोर्सेस करण्यासाठी शिष्यवृत्ती कोणती मिळू शकते? करिअर साठी आवश्यक असणाऱ्या महाविद्यालयांची यादी इत्यादी बाबत सविस्तर माहिती मुंबई येथील समुपदेशक देणार आहेत. तालुका स्तरावरून विविध शाळा 


एकत्रित करून त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी 8.30 व सायंकाळी 7.00 वाजता हे ऑनलाईन सत्र गूगल मीट वर चालणार आहेत.

या ऑनलाईन चर्चासत्राची लिंक विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक

 व शिक्षकांच्या मार्फत व्हाट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.किनवट तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा यासाठी यापूर्वीच 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांना त्यांचा सरल आयडी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्याप्रसंगी

 करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना महा करियर पोर्टल वापरण्यासाठी त्यांचा सरल आयडी आणि 123456 हा पासवर्ड सर्वांना लागू पडतो. किनवट तालुक्यातील 

शासकीय व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांची  सभा घेऊन त्यांना नियोजन देण्यात आलेले आहे.
             
 तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती, विषय तज्ज्ञ हे या कार्यशाळेचे  समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. नांदेडच्या डाएटचे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर यांनी

 किनवट तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना त्यांची विशेष सोय व्हावी याकरिता मुंबईतील समुपदेशक प्रामुख्याने उपलब्ध करून दिलेले आहेत.आपल्या शाळेची कार्यशाळा 

 दिवशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. असे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने व तालुका संपर्क अधिकारी अधिव्याख्याता अभय परिहार यांनी केले आहे.