Ticker

6/recent/ticker-posts

कोणत्या गोष्टींचं किती राजकारण करावं याची देखील नैतिक मर्यादा असावी . पण आज या गोष्टीचं काही महत्त्व राहिलं नाही



कोणत्या गोष्टींचं किती राजकारण करावं याची देखील नैतिक मर्यादा असावी . पण आज या गोष्टीचं काही महत्त्व राहिलं नाही.

याचा मला खूप खेद वाटतो.भारतात " करोना" विषाणू बाबत हेच घडलं .

संबंध देशात या कोरोना महामारी रोगाची साथ चालू झाली

अनेक जगभरातील शास्त्रज्ञ, डॉक्टर व इतर वैज्ञानिक क्षेत्रातील तज्ञ लोकांना या विषाणूंचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग होऊ नये 

यासाठी कोणतीही "लस"शोधता आली नाही.याला अपयश म्हणावं का अज्ञान ? 

भारतीय वातावरणातील लोकांना शक्यतो अशाप्रकारच्या विषाणूंचा संसर्ग झाला तर तो त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती च्या क्षमतेने मात करता येऊ शकतो. 

       

        पण जे लोक वातानुकुलीत (AC) परिस्थितीत जन्मतात , वातानुकुलीत घरातच लहानाचे मोठे वाढतात व घराबाहेर पडत असताना देखील ते वातानुकुलीत गाडीतून बसून थेट आपल्या कार्यालयात कार्य करतात.

अशाप्रकारची त्यांची सर्वसाधारणतः दिनचर्या ही निसर्गाच्या विरोधात दिसून येते.


 तर मला सांगा या लोकांना निसर्गाच्या सान्निध्यातील जी अनमोल अशी हवा , सुर्यप्रकाश 
व पाऊसाचे पाणी याचा स्पर्श देखील शरिरातील कोणत्याही भागांवर होतो का ? या वेळी मला " राजीव भाई दिक्षित " यांची आठवण होते . 

त्यांनी आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत जन्मलेल्या ॠषिंबद्दल चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवली.

 चरक , वागभट्ट व पतंजली अशी अनेक ॠषि आहेत 


जेकी प्रत्यक्ष शास्त्रज्ञनच होते. पण आपण कधी यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत नसतो.आपल्याला एकच वाटते ते म्हणजे आपले आरोग्य तात्काळ कसे बरे होईल.

 पण आपण असा कधी विचार करतो काय की आपल्या " शरिर "  व  " मनाला " स्वस्थ आणि त्याचं स्वास्थ्य (आरोग्य) बरं कसं राहते  व ते कसं बरं ठेवता येईल हे आपण दैनंदिन जीवनातील एक दिनचर्या बनविली पाहिजे. 


आपलं शरीर हे एक स्थूल स्वरूपातील देह असतो तर मन हे एक सुक्ष्म स्वरूपातील‌ देह असतो 

नुसतं शरीराची खुप काळजी घ्यायची अन् मनाचं आरोग्य  मात्र कसं ही राहो


मन आणि शरीर यांच्या आरोग्याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम  महाराज यांनी देखील अनेक सिद्धांत मांडले आहेत.परंतू आमच्याकडे यांच्या साहीत्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वेळ नसतो. जेकी फुकट आहे.

   

      मित्र हो कोरोना विषाणूंची मारक क्षमता खुप असू शकते .

 कारण लक्ष्मण स्वता शेषनाग ईश्वराचा अवतार होता 

तो देखील इंद्रजिताच्या शक्ती ने घायाळ झाला होता

प्रत्येक शस्त्र , अस्त्र व इतर विषारी शक्ती ची ताकद असते पण त्यावर उपाय निश्चित च असतात.

त्यामुळे कोरोना विषाणूंना देखील एवढं सहज व सोपं हलकं आहे 

म्हणून टाळू नका .पण निश्चित च खबरदारी मात्र घ्यावीच.

       


        कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या पैकी बरेच हे शेतकरी व कष्टकरी नाहीतच. भारतात कोरोनामुळे मृत्यू पावलेले रूग्णात शेतकरी व कष्टकरी अजिबात नाहीत असे मी विश्वासाने सांगतो. 

भारतातील कोरोनामुळे मृत पावलेल्या ची यादी निश्चित जाणकारांनी तपासून पाहावी

पण मी असं म्हणत नाही की तुम्ही काळजी घेऊ नका.

 निश्चितच प्रत्येक भारतीय नागरिकांनी शासन व प्रशासन यांच्या सुचनांचे निश्चितच अनुपालन करा 

असे मी याद्वारे जाहीर आवाहन करतो.जय हिंद....जय भारत.

                                         आपलाच

                                    मा.आर आर शिंदे
                                  (सामाजिक कार्यकर्ता)
                           भ्रमणध्वनी क्र  ९८५०५३८७०९
                            (व्हाट्सअप)