आरोग्य सेविका पदावर कार्यरत असलेल्या सुलोचना पंढरीनाथ बुरकुले या महिलेचा ट्रक
मोटार सायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १२आक्टोबर २०२० रोजी बारड जवळ घडली आहे.
सुलोचना पंढरीनाथ बुरकुले ही महीला सहस्त्रकुंड वाळकी येथिल
असून सुलोचना बुरकुले या महिलेने आरोग्य सेविका पदावर असताना आदिवासी दुर्गम भागातील अनेक प्राथमीक आरोग्य केंद्रात
अंतर्गत काम करत असताना कधीच वेळेचा किंवा सुटीचा विचार न करता आरोग्य सेवा करण्यासाठी ती सतत हजर राहत असे,
आज सुलोचना बुरकुले आपल्या खाजगी कामाच्या निमित्ताने ती आपल्या मोटार सायकलने नांदेडला जात असताना मोटार सायकल व ट्रकचा अपघात झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताने सहस्त्रकुंड वाळकी येथे शोककळा पसरली आहे.