Ticker

6/recent/ticker-posts

माझा अनुभव 💉💉असलम इसाक बागवान. ✍️✍️आजचा जमाना आणी या जगातील बहुतांश


 माझा अनुभव 💉💉
असलम इसाक बागवान. 
✍️✍️
आजचा जमाना आणी या जगातील बहुतांश " 


सोशल मीडिया " वर सर्रास वापरतात या मध्ये मला आलेला अनुभव मी येथे *प्रांजळ पणे* मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 


व्हटस अप, फेसबुक, ट्विटर, व इतर सोशल मीडियावर येणारे विविध पोष्ट, इतरांचे शेअर केलेले पोष्ट, वाढदिवसाच्या शुभेच्छा चे पोष्ट, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय पोष्ट, धार्मिक उपदेश पोष्ट इत्यादी, 


आपण पाहिले असेल काहि जण उपदेश, व इतर माहिती चे पोष्ट टाकतात त्यातील ९९ टक्के पोष्ट करणार्‍याला ना त्या विषयाचा गंध असतो ना अभ्यास, बरेच पोष्ट जनतेला शिकवण देणारे पोष्ट असतात परंतु त्यांची वागणूक अगदी त्याच्या विपरीत. 


एकदा माझ्या एका मित्राने मला आणी इतर गृपमध्ये एक खुप संविधनशील पोष्ट त्याच्या नावा निशी टाकली, ती पोष्ट वाचुन मलाहि आश्चर्याचा धक्काच बसला कारण हि होते तशे कारण तो *चक्क ४थी फेल होता* , 


काहि मार्मीक पोष्टहि असतात परंतु त्या इतर विनाकारणाच्या पोष्ट मध्ये झाकुन जातात. 
आज पर्यंत गृपचा ध्येय आणि उद्देशाची अँडमिन वारंवार अठवण करून देत असतो परंतु अशा 

*व्यक्ती जानुन बुझुन पोष्ट* टाकतच जातात, काहि धार्मिकतेचा आव आणून उपदेश देत राहतात

 दुसर्‍याच्या भावनेचा विचार न करता. 
या द्वारे मला विद्वान व अती विद्वानाना एकच विनंती आहे की पोष्ट विचारसुद पध्दतीने कोणाच्या भावना न दुखवता केल्यास वाचण्याचा कंटाळा व राग येणार नाही. 


या लेखात माझा उद्देश कोणाची *भावना दुखावण्याचा* किंवा *त्यांना पोकळ वाघ म्हणण्याचा* मुळीच नाही, 

जर कोनाला असे वाटत असेल तर तो योगायोगच समजावा. 
झिंदाबाद।।