किनवट शहर व परिसरात ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
किनवट : भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखेच्या वतीने रविवारी (दि.२५)
६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
किनवट व गोकुंदा परिसरातील वार्ड व नगरामध्ये सकाळी ७:३०वाजता धम्मध्वजारोहण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, गोकुंदा येथे सकाळी ठिक ८:३० वाजता धम्मध्वजारोहण व वंदना घेण्यात आली.
किनवट येथील मुख्य कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी दहा वाजता झाला.
तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजारोहण करण्यात आले
याप्रसंगी संस्कार विभागाच्या वतीने तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे व बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी सामुहिक वंदना घेतली.
सिद्धार्थनगर येथील जेतवन बुद्ध विहारात
सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्याहस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा.सुबोध सर्पे यांनी कले.२२ प्रतिज्ञा चे सामुदायिक वाचन महेंद्र नरवाडे यांनी केले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,देविदास मुनेश्वर,
अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस प्रा.डॉ. अंबादास कांबळे,
जिल्हा उपाध्यक्ष उत्तम कानिंदे, तालुकाध्यक्ष प्रा.रविकांत सर्पे, तालुका सरचिटणीस प्रा.डॉ.पंजाब शेरे,
सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके, संगिता पाटील, ऍड.दिव्या सर्पे, चंद्रभागाबाई कावळे, योजना पाटील, पंचाबाई सर्पे, ललिता मुनेश्वर,
सागरबाई नगारे, पुनम तथागत कावळे, सुमित्राबाई कावळे, लक्ष्मीबाई पाटील, रोहिणी मुनेश्वर, सूर्यकांता सर्पे,
सुशीला ठमके, शोभा भवरे, शषीकला कावळे, माला नगारे, राहिबाई पाटील, करूणा पवार, सारजाबाई कावळे, वर्षा ठमके,
वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील,
गर्जे जयभीमचे संस्थापक दीपक ओंकार, बसपाचे मिलिंद धावारे,मल्लुजी येरेकार, प्राचार्य राजाराम वाघमारे,
उपप्राचार्य एस.के.राऊत, प्रा .एस. डी.वाठोरे,रुपेश मुनेश्वर, दिलिप पाटील, रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, ऍड.
जी.एस.रायबोळे, ऍड.सुनिल येरेकार, माजी नगरसेवक नितिन कावळे,
सेक्युलर मुव्हमेंटचे जिल्हा संघटक ऍड.मिलिंद सर्पे,
क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांच्यासहभारतीय बौद्ध महासभा
तालुका शाखा किनवटचे पदाधिकारी व विविध नगरातील पदाधिकारी, बौद्ध उपासक- उपासिका यांनी शारीरिक अंतर ठेवून व शासनाचे नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी केला
अशी माहिती बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांनी दिली आहे.