बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,नाशिक अभ्यास केंद्र बळीराम पाटील महाविद्यालय ,
किनवटच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत
किनवट परिसरातील जनतेचे कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, संस्थेचे सर्व सन्मानीय पदाधिकारी,
प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट
तालुक्यातील नवाखेडा येथे रासेयो स्वयंसेवक यांनी कोरोना, महामारीपासून बचाव करण्यासाठी रोज स्वच्छ हात धुवावे,मास्क वापरावे, कणकण वाटत असल्यास दवाखाण्यात दाखवावे.
बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुऊनंच घरात जावे. आपल्या कुटुंबाला कोरोनापसून दूर ठेवण्याची जबाबदारी तुमचीच आहे.
ताप, खोकला, सर्दी, गळयात त्रास होत असेल तर दवाखाण्यात जाऊन तपासणी करुन घ्यावे
असे जनजागृती करतांना रासेयो स्वयंसेवक सांगत आहेत.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, शाखा किनवट क्रेंद्र संयोजक प्रा. शिवदास बोकडे,
सहसंयोजक डॉ.योगेश सोमवंशी, रासेयो कार्यक्रम अधिकारी
प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. सुलोचना जाधव, प्रा. राहुल मुनेश्वर, श्रीराम खिल्लारे, शुभम गाजलवार,
संजय थोरात, कपील जाधव, सुरज आढागळे, शादाब, संजय चुनगुनवार, किशोर आडे, जगदीश आडे इ. स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत.