Ticker

6/recent/ticker-posts

किनवट / तालुका प्रतिनिधी : वर्षावास समाप्ती निमित्त आश्विन पौर्णिमेला क्रांतीसुर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित


"बुद्ध क्रोधाचा विरोध, बुद्ध वैऱ्याची ही माया ;  
बुद्ध संयमाचे घर, बुद्ध शीतलती छाया " 


ऑनलाईन कविसंमेलनात बुध्द विचारांची ज्ञानवृष्टी ..
आश्विन पोर्णिमेनिमित्


किनवट / तालुका प्रतिनिधी : वर्षावास समाप्ती निमित्त आश्विन पौर्णिमेला क्रांतीसुर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित 

ऑनलाईन धम्म कवीसंमेलनात झाली बुद्ध विचारांची ज्ञानवृष्टी!

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द साहित्यिक कवी प्रा .नंदू वानखडे, मुंगळा (वाशिम) हे कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यात प्रा.सुभाष गडलिंग (अमरावती), महेंद्र नरवाडे (किनवट), आनंदकुमार शेन्डे (वणी), कुसुम भवरे (यवतमाळ), प्रितम देवतळे (घाटंजी) रुपेश मुनेश्वर (किनवट), 

सुरेश शेंडे (किनवट), प्रा.विनोद कांबळे (माहूर), प्रा.धनराज हलवले (घाटंजी), राजा तामगाडगे (किनवट) हे सहभागी कवी
                 
 प्राचार्य सुरेश पाटील यांच्या ' तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी ' या अभिवादन गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी बहारदार सुत्रसंचालन केले. क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. गुगल मीट वर झालेल्या या कार्यक्रमाची तांत्रीक बाजू रुपेश मुनेश्वर यांनी सांभाळली. 
" मानवतेचा अन करुणेचा जगा दे संदेश..
हा बुद्धाचा देश मानवा हा बुद्धाचा देश..
मनामनातील संभ्रमाचे आकाश
दिसते निळे दिवसा रात्रीला काळे 
पुसोनी टाका भाळावरची तो भेदाची रेष 
बुद्धाचा देश मानवा हा बुद्धाचा देश.."

या कवितेने कविसंमेलनाध्यक्ष प्रा. नंदू वानखडे यांनी संमेलनाची सुरवात केली. त्यानंतर प्रा.सुभाष गडलिंग यांनी अप्रतिम रचना सादर करून श्रोत्यांचे लक्ष वेधले..

" आभाळाच्या फांदीवर
उमलून आलेल्या उत्फुल्ल
वैशाख पुनवेचा चंद्र बुडत आहे बुद्धत्वाच्या उष:काळात... "

कवी आनंदकुमार शेन्डे यांनी विद्रोही रचना सादर करुन दाद मिळवली..
" कोणी लिहिला हा इतिहास दोस्ता 
कुणी आवळला हा गळफास दोस्ता 
किती लावशील ठिगळं
तुझ्या त्या फाटक्याच लक्तरांना
नको परिवर्तनाचा नुसता आभास दोस्ता.. "

सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी महामानवांच्या विचारांची पेरणी करणारी कविता सादर केली..
" बाबा तुमची पोरं, शिका संघटित व्हा 
संघर्ष करा धडा हा गिरवू लागली..
बुद्ध विचार पेरणी, जणा मनात करून 
परिवर्तनाचे चक्र फिरू लागली.."

प्रीतम देवतळे या कविनी बुध्द तत्वज्ञानाची विचार सांगणारी कविता सादर करुन मंगल मैत्रीची कामना केली..
" बुद्ध क्रोधाचा विरोध 
बुद्ध वैऱ्याची ही माया 
बुद्ध संयमाचे घर 
बुद्ध शीतलती छाया.. "

प्रा. विनोद कांबळे यांनी अप्रतिम रचना सादर करून दाद मिळविली..
" प्रज्ञा शील करुणाचा कळाला आम्हा अर्थ 
पंचशीलाच्या पालनानेच जीवन आमचे सार्थ 
अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता
दिलेस वरदान तू तथागता 
युद्ध नको बुद्ध हवा विश्वाला हे कळलं..
शांतिदूता.. हे फक्त तुलाच जमलं..!"

कवयित्री कुसुम भवरे यांनी बुद्ध धम्म संघ रत्नाची महती सांगणारी रचना व रमाई सादर केली..
" वर्षावास समाप्ती दिनाला
भगवंत देई भिक्खूंना आदेश
करे चारिका जावे चारही दिशा
बहुजन हिताय बहुजन सुखाय
हाच मंगलमय उपदेश.. ! "

गीतकार सुरेश शेंडे यांनी गेय स्वरूपात कविता सादर करून दाद मिळविली..
"बेहाल होते बेहाल 
संपले दिवस महिने साल!
भिमरायाच्या पुण्याइने 
आम्ही झालो मालामाल..!"

कवी रुपेश मुनेश्वर यांनी गेय कविता सादर करून वाहवा मिळवली..
" हिंसा नको कधीही, कायेने वाचेने 
ठेवावे शुद्ध आचरण, बुद्धाचे सांगणे "

युवाकवी राजा तामगाडगे यांनी सुंदर रचना सादर करून वाहवा मिळवली..
" चल उठ चेतवून टाक साऱ्या जगाला 
एकत्र कर समतेच्या निळा झेंडा खाली 
संपूर्ण भिमशक्ती, तरच घडेल सम्यक क्रांती 
आणि मिळेल बुद्धाला शांती.. ! "

आई आणि बाबाचं नातं सागणारी वास्तव कविता प्रा. धनराज हलवले यांनी सादर केली..
" मरण यातना सोसताना 
आई जन्म देत असते ,
आपलं हसू पहात पहात 
प्रसूती वेदना विसरून हसत असते.."

क्रांतीसुर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित ऑनलाईन कविसंमेलनात सहभागी कवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. गुगल मीट वर झालेल्या या कार्यक्रमास बहुसंख्य श्रोते ऑनलाईन उपस्थित होते.