हिंगोली शहरातील प्रख्यात उद्योजक तथा माझे मित्र श्री मिलिंद यंबल यांच्या राजयोग मेडीमार्ट
या अद्ययावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दालनाचा शुभारंभ ऑल इंडिया केमिस्ट अँड
ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे अप्पा यांच्या शुभहस्ते व माझ्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माझ्यासोबत शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा
मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर, कारंजा-मानोरा
विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी,
हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे,
शिवसेना जिल्हा उपप्रमुख परमेश्वर मांडगे, उद्धवराव गायकवाड,
हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक राम कदम,
बिरजू यादव व राजयोग मेडीमार्टचे कुशल जैन यांची उपस्थिती होती