Ticker

6/recent/ticker-posts

देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू, श्रद्धास्थान, महान तपस्वी श्री संत रामरावजी महाराज यांच्या निधनाचे



देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू, श्रद्धास्थान, महान तपस्वी श्री संत रामरावजी महाराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. 


त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! 


देशभरातील बंजारा बांधवांच्या दुःखात आम्ही सारे सहभागी आहोत. 

वाशिम जिल्ह्यातील श्री पोहरादेवी संस्थानचे प्रमुख आणि श्री संत सेवालालजी महाराज यांचे वंशज असलेले 

श्री संत रामरावजी महाराज यांनी अनेक सामाजिक सुधारणांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. 

अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षण प्रसार यासाठी ते सतत आग्रही असत.


श्री संत रामरावजी महाराज यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले. 

पोहरादेवी संस्थानचा विकास करण्यासाठी आमच्या काळात अनेक निर्णय झाले,

 तेव्हा त्यांच्याशी वारंवार संवाद होत असे.

त्यांच्या स्मृतिस मी त्रिवार वंदन करतो.
माझी राज्य सरकारला विनंती आहे की, 

श्री संत रामरावजी महाराज यांचे जीवनकार्य आणि देशभरातील बंजारा बांधवांच्या भावना पाहता, 

त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत.