आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दिशा समितीच्या बैठकीमध्ये विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.
त्यामध्ये चालू खरीप हंगाम संपत आला तरी बँकांनी अद्यापपर्यंत केवळ ३० टक्के पीक कर्ज वाटप केले आहे.
तसेच पीक कर्ज मागणी साठी बँकेत गेलेल्या शेतकरी बांधवांना बँक अधिकारी अपमानास्पद वागणूक देत असून त्यांच्याशी अरेरावीने वागत आहेत.
या संदर्भात संबंधीतावर कारवाई करणे गरजेचे आहे.
तसेच माझ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातुन जाणाऱ्या 361 आणि 161
या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात झालेल्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात,
घरकुल योजना तसेच नांदेड शहरात दोन दिवसाआड
पाणीपुरवठा, नांदेड शहरातील ड्रेनेज लाईनचा गंभीर प्रश्न, संजय गांधी निराधार योजनेचे निधी वाटप
किनवट माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे, पीकविमा तक्रारी बाबत तालुका स्तरावर कार्यालय सुरू करावे,
प्रशासनाकडून लोक अदालत घेण्यात यावी तसेच नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायती अंतर्गत प्रलंबित घरकुल निधी या
प्रश्नावर प्रामुख्याने बैठकीत मुद्दे मांडून प्रशासनास पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या...