Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज एका कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी, एकही बाधित नाही


किनवटमध्ये आज एका कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी, एकही बाधित नाही 

किनवट / तालुका प्रतिनिधी  मंगळवार 13 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 

तालुक्यात आज एक व्यक्ती औषधोपचारानंतर कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. आज एकाही  व्यक्तीचा अहवाल बाधित आला नाही.  
               

 त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 541 झाली आहे. आजपर्यंत 469 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. .
           

बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 8 व होम क्वारंटाईन 25 अशा एकूण 40 रुग्णांवर 

औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या

असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 13/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता


आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 725,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-603,
आज घेतलेले स्वॅब -5

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 5,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजन टेस्ट- 7,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-0,
निगेटिव्ह अहवाल -7,


आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -541, 
आज सुटी दिलेले - 1,


रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-469,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15 (25 होम क्वारंटाईन)