Ticker

6/recent/ticker-posts

आज विकासभाऊचा वाढदिवस..विकास बाबा आमटेज्या पिढीने बाबांना बघितले नाही



आज विकासभाऊचा वाढदिवस..

विकास बाबा आमटे

ज्या पिढीने बाबांना बघितले नाही

बाबा फारसे माहित नाही त्यांना बाबांचे आनंदवन हे विकास आमटे यांचेच आनंदवन वाटते. 

वास्तवीक पाहता ते पुर्णपणे खरे आहे. 

आज विकास भाऊ ७४ वर्षाचे झाले आहेत.

 एम.बी.बी.एस. झाल्यापासून ते आजतागायत आनंदवनाच्या विकासात पुर्णपणे मग्न आहेत. 

सत्तरीच्या दशकात त्यांनी आनंदवनाच्या कारभारात लक्ष घालणे सुरू केले. 

बाबा हयात असतांना त्यांच्या विचारांना कृतीत उतरविण्याचे कार्य विकासभाऊंनीच केले. 

त्यांनी त्यांच्या स्वप्नांना काही प्रमाणात आकार दिलाही असेल पण बाबांच्या स्वप्नांना कृतीतुन मुर्तरूप देणारा, 

बाबांच्या संकल्पना साकार करणारा 
एकमेव माणूस म्हणजे विकासभाऊ त्यांच्याच शब्दात बाबांच्या स्वप्नांचा ठेकेदार.

खूप जणांना तर आनंदवन विकास आमटे यांचेच वाटते ते खरेही आहे. 

इतका प्रदिर्घ काळ ज्यांनी आनंदवनात नवनवीन कल्पना प्रकल्प स्वरूपात राबविल्या व आनंदवन जागतीक पातळीवर नेऊन ठेवले. खऱ्या अर्थाने आनंदवन “प्रयोगवन” बनले.

प्रचंड पत्रव्यवहार, संपर्क व लोकसमुदाय ही विकासभाऊची व पर्यायाने आनंदवनची खरी ओळख. 

ही ओळख होण्यास रात्र-दिवस कष्ट व मेहनत घेण्याची विकासभाऊची मानसीकता युवा पिढीला खरोखरच प्रेरणा देणारी आहे. 

आनंदवना पाठोपाठ हेमलकश्याला कुमक पाठविण्यापर्यंत 
प्रकाश भाऊचा हा प्रकल्प उभारण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या विकासभाऊने सोमनाथ, अशोकवन, मासळ, व 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भातील मुळगव्हाण इत्यादी प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवण्यापासून ते सक्षमपणे कार्यरत ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे व्यक्तीमत्व म्हणजे विकासभाऊ.

 स्वरानंदवन हा उपक्रम त्यांच्या मनातील हृदयातील व मेंदूतील भाव भावनांचा अविष्कार सर्वांना भावलेला संगीत उपचार.


आता ते म्हणतात की तिसऱ्या पिढीकडे सोपवले आहे पण त्यांचा जिव व मन आनंदवन सोडवत नाही हेच खरे आहे. 

आलेल्या पाहुण्यांना आनंदवन समजाऊन सांगणारा त्यांच्याशिवाय दुसरा कोण असू शकतो त्यामुळे त्यांचे कार्य अजूनही सातत्याने चालू आहे.

 प्रकृती अधून मधून कमी जास्त होतच असते तशी परीस्थीतीही या सर्वांवर ते मात करीत आलेले आहेत आताही करतील. 

सध्याची परीस्थीती त्यांनी आनंदवनाचा संपूर्ण कारभार स्वत:कडे घेण्याची आहे.


पण त्यांचे कष्ट व मेहनत सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन, प्ररेणा व पाठबळ देते आहे व देत राहिल. 

वैयक्तीक पातळीवर अजूनही ते अस्वस्थ असतात. काय नवीन करू याचा ध्यास व वेध घेत असतात.


विकासभाऊ हे बाबांचे जेष्ठ सुपूत्र, बाबांच्या नावाच्या व लहान भाऊ प्रकाशच्या पराकोटीचा त्याग करून उभारलेल्या कामाच्या प्रसिध्दीच्या ओझ्याखाली विकासभाऊंचे दबलेले व 

प्रसिध्दीपासून आणि पर्यायाने उच्च मान सन्मानापासून दुर्लक्षीत राहिलेले त्यांचे अमोघ असे

 कर्तृत्व जवळच्या व माहितीतल्या लोकांनाच ठाऊक आहे.

त्यांना दीर्घायुरोग्य लाभो, 

आता आम्ही त्यांची पंच्यात्तरी साजरी करूच पण शतकपुर्ती सोहळाही व्हावा ही आकांक्षा आपण बाळगू. विकासभाऊ 

आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी तुमचा वाढदिवस पुन्हा पुन्हा साजरा करूया. आम्हाला आशिर्वाद द्यावेत व शुभेच्छा स्विकाराव्यात.

डॉ. अशोक किनवट