Ticker

6/recent/ticker-posts

माझ्या हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव तहसिल कार्यालयात माझ्या उपस्थितीत आज जनता दरबार घेण्यात आला



माझ्या हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव तहसिल कार्यालयात  माझ्या उपस्थितीत आज जनता दरबार घेण्यात आला.
 

     या जनता दरबारात ज्या बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट  पूर्ण केले नाही

 त्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला तसेच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी ज्या बँका टाळाटाळ करत आहेत ,

 पीक कर्जासाठी  बँकेत  येणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून  अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर या पुढे खपवून घेतल्या जाणार नाही असे सांगितले. 

या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गावरील वारंगा ते हदगाव या मार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याचे  काम सुरू करून रस्ता दुरुस्त करण्यात यावा 

अशा सूचना संबंधितांना दिल्या. 

याच सोबत पीकविमा व इतर कृषी विभागाच्या विविध योजनेचा आढावाही घेतला

गोर गरीब जनते पर्यंत या योजनेचा लाभ देण्यासाठी 

अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.  
              
  
 या बैठकीस माझ्यासह माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर ,उप विभागीय अधिकारी डापकर, 

तहसीलदार गायकवाड, गटविकास अधिकारी गड्डाफोड, 

पोलीस निरीक्षक खुसे, नांदेड जिल्हा अग्रणी बँकेचे पठारे, उपजिल्हाप्रमुख रमेश   घंटलवार

,जि.प.सदस्य विजय बास्टेवाड,

 पं. स.सभापती सौ.महाडाबाई तम्मलवाड, 

न.प.मुख्याधिकारी येरावार, डॉ.भोळे,शहर प्रमुख राहुल भोळे, 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम,नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.