Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि १५ परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले असल्याने हवालदिल झालेल्या शेतक-यांना



किनवट ता.प्र दि १५ परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले असल्याने हवालदिल झालेल्या शेतक-यांना 

तत्काळ शासनाने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत झाहीर करावी अशा आशयाचे निवेदन 


राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाकडुन राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना तहसिलदार किनवट यांच्या मार्फत देण्यात आले. 
       

परतीच्या पावसाने या अधिकमासात शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे तोंडाला आलेला घास हिसकावुन घेण्यात आला आहे 

त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये शेतक-यांवर आभाळ कोसळले आहे, आता येणारे सण साजरे कसे करावे 

अन येत्या हंगामाची पेरणीची तयारी कशा प्रकारे करावी हा मोठा प्रश्न शेतक-या समोर उभा राहिला आहे, 

याच अणुषंगाने राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना 


तहसिलदार किनवट यांच्या मार्फत मदती करिता सहानभुतीपुर्वक मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे.
      


 यावेळी तहसिलदार उत्तम कागणे यांनी निवेदन स्विकारले तर राष्ट्रवादी कॉग्रेस चे राहुल नाईक, 

कचरु जोशी, बालाजी बामणे, राजु सुरोशे, महेश चव्हाण तंबाखुवाला, महेश कनकावार, 

पमा शेळके, अमोल जाधव, यांच्या सह अनेक शेतकरी व युवकांची उपस्थिती होती