मार्च 2020 नंतर लॉकडाऊन मुळे किनवटचा
मासिक आर टी ओ कॅम्प बंद होता तो आज
दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी किनवट तालुकाकरिता पूर्ववत सूरु झाले
त्या प्रसंगी वरिष्ठ परिवहन निरीक्षक श्री अनासाने व वरिष्ठ परिवहन निरीक्षक श्री फूनसे हे कॅम्प पूर्ववत सुरू करण्याकरिता आले
असता त्यांचे श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह हिरो शोरूम येथे किनवटवासीयां कडून सत्कार करण्यात आला व
किनवटवासियाची नांदेड चा फेरा मारण्या पासून मुक्तता केल्यामुळे आभार व्यक्त करण्यात आले
तर नांदेड च्या परिवहन कार्यालयाचेही आभार व्यक्त करण्यात आले,
कॅम्प पूर्ववत सुरू करण्यासाठी आ. भीमराव केराम, न .प बांधकाम सभापती व्यंकट नेम्मानिवार व गुरुप्रीत सिंग सोखी यांनी पाठपुरावा केला.