Ticker

6/recent/ticker-posts

*राष्ट्रीय जनगणना 2021 मध्ये ओबीसींची जनगणना करण्यात यावी याकरिता किनवट येथील ओबीसी बांधवांच्या वतीने प्रधानमंत्री


*राष्ट्रीय जनगणना 2021 मध्ये ओबीसींची जनगणना करण्यात यावी याकरिता किनवट येथील ओबीसी बांधवांच्या वतीने प्रधानमंत्री, 

गृहमंत्री, मुख्यमंत्री, जनगणना आयुक्त, आमदार व खासदार महोदयांना निवेदन!*

किनवट 
दि. 26/11/2020

जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा काॅलम समावेश करून ओबीसीची जनगणना करण्यात यावी, 

आणि ओबीसीची जनगणना होत नसेल तर ओबीसींचा जनगणना मध्ये सहभाग असणार नाही याकरिता किनवटचे तहसीलदार महोदयां 

मार्फत, देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित भाई शहाजी, राज्याचे मुख्यमंत्री महोदय उध्दवजी ठाकरे साहेब, जनगणना आयुक्त यांना निवेदन पाठविण्यात आले.

 तर ओबीसी जनगणना विषय विधीमंडळात व संसदेत मांडून पाठपुरावा करावा

 यासाठी अनुक्रमे  किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. भिमरावजी केराम साहेबांना त्यांच्या 

स्विय सहाय्यकामार्फत आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. हेमंतजी पाटील साहेबांना त्यांच्या संपर्क प्रमुखा मार्फत निवेदन किनवट येथील ओबीसी बांधवांच्या वतीने देण्यात आले!


यावेळी सर्व ओबीसी बांधव श्री संतोषजी धोकटे साहेब, श्री के डी जाधव साहेब,

 दैनिक वाचकमंचचे प्रतिनीधी  आणि वंजारी पुकार साप्ताहिकाचे संपादक श्री दत्ता जायभायेजी, 

ओबीसी अॅक्टिव्हीस्ट श्री ज्ञानेश्वर भाऊ फड, श्री रामकिशन कागणे साहेब, श्री नागरगोजे सर, 

राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे तालुका अध्यक्ष श्री विनोदजी पवार, आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री अरूणजी जाधव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले!