Ticker

6/recent/ticker-posts

आज दि. 21/11/2020 रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका किनवट च्या वतीने 12 वीच्या परीक्षेनंतर विविध शाखेत



आज दि. 21/11/2020 रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका किनवट च्या वतीने 12 वीच्या परीक्षेनंतर विविध शाखेत नावलौकिक मिळवलेल्या समाजातील विविध घटकातील गुणी विध्यार्थ्याणचा सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले.


1)फकिरराव जुनगुरे या चणे फुटाणे विकनाऱ्या पालकाचा मुलगा रामप्रसाद जुनगुरे याने NEET परीक्षेत 625 गून घेऊन पुण्याच्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला.त्या बद्दल विध्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.


2)श्री अमोल उत्तरावर यांची कन्या श्रेया उत्तरवार हिने NIT मध्ये रायपूर छत्तीसगढ च्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवला या बद्दल पालकासह विध्यार्थीनींचे अभिष्टचिंतन करण्यात आले.


3)श्री मारोती मुलकेवार यांची कन्या स्वरांजली मुलकेवार हिने NEET परीक्षेत 578 गुण घेऊन आंबेजोगाई च्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला या बद्दल पालकासह विध्यार्थीनीचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
  

    या प्रसंगी संघाचे जिल्हाउपाध्यक्ष मा.श्री रमेश पवार,तालुकाध्यक्ष मा.श्री अनिल गुंजकर,उपाध्यक्ष मा.श्री भास्कर काळे, कोषाध्यक्ष मा.श्री प्रदीप कुडमेथे,संघटक श्री फाळके सर,श्री डंबाळे सर,श्री राजू शिंदे,श्री लक्ष्मण जाधव,श्री उत्तरवार सर,श्री मुलकेवार सर हे मान्यवर उपस्थित होते.
🥇🥈