यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे.
सओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार
असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे.
यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे.
अंतिम वर्षांच्या रखडलेल्या परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र आता वाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे.