Ticker

6/recent/ticker-posts

*निवृत्तिवेतनधारकांच्या बँक खात्यातून होत आहे संशयास्पद कपात, बँकेचे अधिकारी करत आहेत अक्षम्य दुर्लक्ष



*निवृत्तिवेतनधारकांच्या बँक खात्यातून होत आहे संशयास्पद कपात, बँकेचे अधिकारी करत आहेत अक्षम्य दुर्लक्ष*


किनवट ता.प्र दि १ तालुक्यातील अनेक निवृत्तीवेतनधारकांचे भारतीय स्टेट बॅकेच्या किनवट शाखेत खाते आहे

 बॅकेत वाढलेली ग्राहकांची संख्या पाहता प्रत्येक ग्राहकाला म्हणावी ती सेवा बॅकेकडुन मिळत नाही तरीही ग्राहक कशीबशी सेवा घेत आहेत 


परंतु भारतीय स्टेट बॅकेच्या किनवट शाखेतील व्यवस्थापक व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक फटका बसत आहे.

 अशीच एक तक्रार सेवानिवृत्त महसुल कर्मचारी रंगराव नेम्मानिवार यांनी बॅकेकडे केल्या नंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रतिसाद बॅकेकडुन प्राप्त झाले नाही 


उलट पोलिसात तक्रार नोंदवा अशा सल्ला देण्यात आला तर पोलिसांचे म्हणने आहे की प्राथमिक कारवाई हि बॅके कडुन केली गेली पाहिजे 

कारण ग्राहकांचे हित जोपासणे हि प्रत्येक वित्तिय संस्थेची जबाबदारी आहे.
   

    तालुक्यातील अनेक निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यातुन मागील काहि दिवसांपासुन २४० रु, १६०० रु, ८० रु, ४०१ रु, अशा प्रकारे 

संशयास्पदरित्या खात्यातुन पैसे कपात होत आहे जे कि पॉस ट्रान्सेक्शन आहे 

म्हणजे कोणत्यातरी ठीकाणी त्या खात्यातुन पैसे अदा करण्यात आले आहेत 

आता याबाबत विचारणा करण्याकरिता बॅकेत ग्राहक गेले असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहे 

त्यामुळे बॅकेच्या भुमिके बाबत ग्राहकांमध्ये संशय येत आहे. अशाच प्रकारची तक्रार सेवानिवृत्त महसुल कर्मचारी रंगराव नेम्मानिवार यांनी केल्या नंतर 

देखिल बॅकेने त्यांच्या खात्यातुन कपात झालेल्या पैसाचा वापर कोणत्या ठीकाणी केला गेला याबाबत कोणतीच माहिती दिली नाही 

त्यामुळे बॅके विरुध्द पोलिसांत तक्रार नोंदवु व या प्रकरणाचा छडा लावु असा निर्धार नेम्मानिवार यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक 

निवृत्तीवेतनधारकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी आहेत परंतु वृध्द व ज्येष्ठ नागरीकांना बॅकेच्या 

चकरा मारणे शक्य होत नसल्याने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे यामुळे त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.
   
    एकिकडे शासन व देशातील वित्तिय संस्था ह्या नागरीकांना आपले व्यवहार हे डिजिटल माध्यमाव्दारे करा असे आवाहन करत आहेत

 तर डिजिट्ल व्यहहारामुळे होत असलेल्या नुकसानी 

बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही यामुळे नागरीकांची आर्थिक हेळसांड होत आहे.
   
    तरी याबाबत परिसरातील व संबधित लोकप्रतिनिधी यांनी बॅकेच्या या कारभारावर 

अंकुश लावुन नागरीकांची होत असलेली आर्थिक पिळवणुक तत्काळ थांबवावी असे सेवानिवृत्त कर्मचारी संघटने कडुन अपेक्षा व्यक्त होत आहेत.