Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या आई वडिलांसोबत फुटाने विकणारा रामप्रसाद


किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या आई वडिलांसोबत फुटाने विकणारा रामप्रसाद...

परिस्थितीवर मात करतं जिद्द संघर्ष आणि मेहनतीच्या बळावर NEET परिक्षेत यश संपादन करून 

MBBS पुणे साठी रामप्रसाद पात्र ठरला...



आज समाजात आपण पाहतो,एकिकडे लाखो रुपये खाजगी शिकवणीवर 

खर्च करून मुलांच्या MBBS प्रवेशासाठी आईवडील सतत प्रयत्न करत असतात,

जिथे मुलांना आईवडलांकडून सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातात तरी मुलं अभ्यासात कुठेतरी कमी पडतात...

मात्र रामप्रसादने आई वडिलांना कसल्याही खर्चातं नपाडता उलट स्वतः आई वडिलांच्या कामात 
मदत करून NEET परीक्षेत 720 पैकी 625 मार्क घेतले आणि MBBS साठी पात्र ठरला...

आणि आजही मनात कसलाही संकोच न करता तो बाजारात मिठाई,फुटाने विकत आहे.. 

त्याच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम...

रामप्रसादला पुढिल वाटचालीस शुभेच्छा.