Ticker

6/recent/ticker-posts

बळीराम पाटील महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी



बळीराम पाटील महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी.

किनवट (प्रतिनिधी )दि ०२,
      बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व 

माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी तथा महर्षी वाल्मिकी हृषी यांची संयुक्त जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम 


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराज बेंबरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, 

राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार डॉ.आनंद भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी सर्वप्रथम प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. 
 

    या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.सुलोचना जाधव यांनी 

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना भ्रष्ट्राचार निर्मुलनाची शपथ दिली तसेच शासनाने दिलेल्या संदेशाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
   

    या कार्यक्रमाला मुक्त विद्यापिठाचे प्रमुख प्रा.शिवदास बोकडे, प्रा.गजानन वानखेडे, प्रा. 

डॉ.पंजाब शेरे, डॉ.लता पेंडलवार, प्रा.सोमवंशी आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.