जमिनीच्या हक्कासाठी उपविभागीय कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलनाला सुरवात*
आदिवासीना जमिनि वरुन हुसकवुन लावने बंद करा*- काॅ.शंकर सिडाम
किनवट:- अखिल भारतीय किसान सभा ,आदिवासी आधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष समिती किनवट – माहूर च्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी दिनांक २५ बुधवार रोजी
उपविभागीय कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरु असून या आंदोलनात प्रचंड संख्य आदिवासी सामील झाले अाहेत.
आदिवासींचे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीपासून आदिवासींना जल गुंगल जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सशस्त्र उठाव केला
स्वातंत्र्यानंतर माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमीनदार ग्रामीण भागातील सेठ सावकार यांनी
जबरदस्तीने किंवा कवडीमोल किमतीने भ्रष्ट
तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, दलाल चमचे, यांच्या मदतीने आदिवासींच्या जमिनी हडप करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36 अ नुसार आदिवासी खातेदारांच्या जमिनीचे कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणास कळक निर्बंध घालण्यात आलेले असतानासुद्धा किनवट माहूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे करण्याचे सत्र चालूच आहे.
मौजे सारखणी येथील सेवानिवृत्त तहसीलदार सिताराम रामजी कूडमित्ते डोणीकर यांचे वडील रामजी महादू कुडमेते डोनीकर यांना हैदराबाद कूळ कायदा ३८ ई प्रमाणे २१ मे १९५७ ला ३० एकर जमीन मिळाली होती,
परंतु सारखणी परिसरातील भू माफियानी बळजबरी ने महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात जमिनीची लूट करून आलिशान बंगले उभे केले आहेत.
उदरनिर्वाहासाठी शिल्लक असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून किनवट माहूर राज्य मार्गाला लागून असलेल्या जमिनीच्या काही क्षेत्रावर 11 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी दहा वाजता च्या सुमारास गैर आदिवासी रमेश राठोड, निर्मला राठोड, मयूर रमेश राठोड,
यांनी बेकायदेशीर 15 ते 20 लोकांचा जमाव करून कुडमेते, डोणीकरब परिवाराला जातीवाचक शिवीगाळ वb जिवे मारण्याच्या धमक्या देऊन अतिक्रमण करून टिनाचे शेड उभे केले आहे.
सदर अतिक्रमणाबाबत तहसीलदार किनवट,पोलीस स्टेशन सिंदखेड यांना तक्रार दिली असता अद्याप कारवाई झालेली नाही. दिवसेंदिवस आदिवासी वरील अत्याचार वाढतच आहे.
अन्याय अत्याचाराच्या विरोधात मौजे सारखणी सह किनवट माहूर तालुक्यातील आदिवासींच्या हस्तांतरित जमिनीची एसआयटीमार्फत चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्याला किंवा त्यांच्या वारसांना जमीन परत देण्याची कारवाई करा,
11 फेब्रुवारी 2020 रोजी कुडमिते, डोनीकर कुटुंबीयांच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण तत्काळ हटवा व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे अतिक्रमण धारकावर गुन्हे दाखल करा, कसत असलेल्या जमिनीचे पट्टे वाटप करा,
मौजे उनकेश्वर येथील माधव गेडाम यांना मारहाण करून पिकाची नासाडी करणाऱ्या मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करा व तत्काळ नुकसानभरपाई देऊन सहकार्य करा
,निराळा येथील माजी सरपंच सुनील गेडाम यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब जेरबंद करा,
या मागणीसाठी आदिवासी आधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष,किसान समिती किनवट सभा माहूर
-किनवट च्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी उपविभागीय कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरु झाले अाहे.
या अांदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीया किसान सभा राज्य अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच चे कॉम्रेड शंकर सिडाम
,शेतकरी नेते काॅ.अर्जुन आडे आदिवासी संघर्ष समिती किनवट माहूर चे वसंत कुडमेते,गणपत मडावी,काॅ.शेषेराव ढोले,दादाराव टारपे हे करत अाहेत.