Ticker

6/recent/ticker-posts

किनवटसाठी दिलासादायक सहावा दिवस : आज एकही बाधित नाही ; एका कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी



किनवटसाठी दिलासादायक सहावा दिवस : आज एकही बाधित नाही ; एका कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी 



किनवट शुक्रवार ता. 6 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार

 आज   13 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली. 

परंतु एकही  बाधित आढळला नाही. 

आज एका कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. 


किनवट तालुक्यासाठी नोव्हेंबरचे पाचही दिवस दिलासादायक ठरले आहेत.
    

       त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 588 झाली आहे. आजपर्यंत 512 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
     

        बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 2, कोविड केअर सेंटर,

 किनवट येथे 0 व होम क्वारंटाईन 21 अशा एकूण 23 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, 

शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, 

असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अब्दुल नासीर अब्दुल बारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल

आरटीपीसीआर टेस्ट

आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 761,

आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-638,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

ऍन्टिजन टेस्ट-13,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-0,

निगेटिव्ह अहवाल-13,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-0,

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -588,

आज सुटी दिलेले-1,

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 512,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 ( 21 होम क्वारंटाईन)