दत्तमांजरी येथे बिरसा महोत्सव उत्साहात साजरा
माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे बिरसा महोत्सव निमित्त
क्रांतीकारक जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा ,
क्रांतीकारक राघोजी भांगरे , रॉबीनहूड शामादादा कोलाम ,
लोकनेते बाबुरावजी मडावी , यांच्या जयंतीचा महोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आमदार भीमरावजी केरामसाहेब , कार्यक्रम अध्यक्ष नारायणरावजी सिडाम, यांची उपस्थिती होती..
विशेष उपस्थिती म्हणून नीळकंठ कातले , रमण जायभाये , संतोष मरस्कोले , जितेंद्र कुलसंगे , ग्रा. प. सदस्य : सुनील चांदेकर,
ग्रा. सदस्या : गोदावरी सुनील चांदेकर, संजय पेंदोर , अनिल तोडसाम, भाऊराव मडावी , किशन आडे, उत्तम मडावी , देवराव अर्के , उकंडराव आरके, अर्जुन आडे , कैलास आडे, गंगाराम मेश्राम, अशोक पेंदोर , विलास पेंदोर , साईनाथ
नागरगोजे , राजू आडे , रवी पोटे , प्रयागराव परचाके , साहेबराव मेश्राम , मारोती बेले , गुंजन चांदेकर , बालाजी चांदेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते...
सर्व प्रथम सर्व महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले..
तद्नंतर दीपाली आरके , सोनाली पेंदोर , मोणाली पेंदोर छकूली आरके या चिमुकल्या विद्यार्थीनी गोड आवाजात स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले..
यावेळी वातोर रे वातोर भगवान बिरसा मुंडा वातोरच्या जय घोषणाच्या गीतात पारंपारिक ढेमसा नृत्याने गावातून मान्यवरांच्या उपस्थित भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गावांतील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत ढेमश्याच्या गीतावर ठेका धरत होते.
कार्यक्रम उदघाटक म्हणून आमदार भीमरावजी केराम यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करतांना शिका संघटित व्हा.
संघर्ष कराचा मुलमंत्र देत डॉ.बाबासाहेब व बिरसाच्या विचारांना अंगीकार करण्याचे आव्हान करत शिक्षण घेऊन मोठे व्हा.समाजाच्या विकासासाठी हातभार लावा.
किनवट मधील चणे फुटाणे विकणारा सामान्य कुटुंबातला मुलगा चांगल्या गुणाने मेडिकलला प्रवेश निश्चित करतोय.
याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यानी झपाट्याने अभ्यास करावे.स्पर्धेचे योग असल्याने शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही.
आदिवासी मुळातच जिद्दी असतो.या जिद्दीने शिक्षणाला महत्व देत अभ्यास करून यशो शिखर सर करा.असे उपदेश करत होते.
उपस्थित मान्यवरांनीही समयोचीत मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केलेत.
यावेळी गावात भगवान बिरसा मुंडा यांच्या तेलचित्राच्या फलकाचे अनावर ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून सुनील चांदेकर यांना मान्यवरांनी धन्यवाद देत त्यांचे स्वागत केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्रीनिवास आरके , बालाजी कोवे , आस्तिक मडावी , महादेव पेंदोर, गंगाराम चांदेकर, गजानन कोवे, उकंडराव आरके, विष्णु घोडाम,
दत्तू आरके, भीमराव आरके प्रवीण मडावी, संदीप आरके, प्रसराम पंधरे,अमित आरके, सुदाम मेश्राम, उमाकांत मेश्राम , विजय मेश्राम,अनिल पेंदोर, विनोद पंधरे आकाश आडे, सुनिल आरके,
_आदीनी कष्ट घेतले तर सूत्रसंचलन सुभाष चांदेकर यांनी तर कार्यक्रमच्या प्रास्तविकाच्या माध्यमातून मा. सुनील चांदेकर यांनी आदिवासी समाजातील विकासातील समस्या, सांगून गावाचा
विकासासाठी किनवट माहूर तालूक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते आदरणीय भीमरावजी केरामसाहिबांना विनंती केले. आभार प्रदर्शन __कार्यक्रमाचे आयोजक मा. सुनिल चांदेकर _____यांनी केले.