Ticker

6/recent/ticker-posts

किनवट दिवाळी पाहाट सुगंधी होण्यासाठी अभ्यंग स्नानात उटण्याला अनन्यसाधारण महत्व असुन यात आयुवैदिक घटक वापरुन सुगंधी उटने तयार

किनवट (तालुका प्रतिनिधी) :  दिवाळी पाहाट सुगंधी होण्यासाठी  अभ्यंग स्नानात उटण्याला अनन्यसाधारण महत्व असुन यात आयुवैदिक घटक वापरुन सुगंधी उटने तयार 

करण्याची प्रथा  आज ही कायम असुन हे काम करतांना ग्रामिण भागातील महिला स्वावलंबी झाल्या पाहिजे 

यासाठी तालुक्यातील पेंदा (नागढव) येथील एकल विद्यालयाची पुर्णवेळ कार्यकर्ती  कु.छाया रामराव कागणे ही युवती एका पायाने अपंग असलीतरी हीचे सुगंधी उटणे आणि केमीकल विरहीत होळीचे रंग देशभरात पोहचले आहेत. 

तीच्या या कार्याची दखल घेऊन  लखनव येथे एकल परिवर्तण कुंभ ठेवण्यात आला तीच्या या  कार्यकैशल्याची दखल घेऊन 

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन  गैरव करण्यात आला.

 हा आदिवासी किनवट तालुक्याचा गैरवच म्हणावा लागेल.                                                                                                     

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी किनवट तालुक्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघा मार्फत एकल विद्यालयाच्या माध्यमातुन महिलांनसाठी पुर्णवेळ  

कार्यकरणारी  कार्यकर्ती कु.छाया रामराव कागणे हीने पुढाकार घेऊन आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर खेडे हा विषय घेऊन मागील दोन वर्षापासुन दिवाळीसाठी सुगंधी उटणे नैसर्गीक घटकापासुन तयार केले 

 विविध ठिकाणी हे सुगंधी उटणे विक्रीसाठी ठेवले

 या उटण्याला ग्राहकांनी मोठी पसंती दिली असुन अल्पावधीतच हे उटणे लोकप्रिय झाले आहे.

 त्यानंतर होळीसाठी अयुवैदिक घटकापासुन विविध रंगही या महिलांच्या माध्यमातुन  बनवीले जातात 

या रंगामुळे त्वचेवर कुठलाही दुषपरीनाम होत नाही. 

अशा कुटीर उद्योगापासुन समृध भारत समृध गाव ही संकल्पना  यशस्वी होण्यासाठी  ग्रामिणभागातील महिलांनी पुढकार घेणे गरजेचे आहे.                                    


एकल विद्यालयाच्या माध्यामातुन १७ फेब्रुवारी 2020 रोजी लखनऊ येथे एकल परिर्वतन कुंभ ठेवण्यात आला होता.

 तिथे देशभारातुन प्रदर्शनीत विविध वस्तु  ठेवण्यात आल्या 

त्या ठिकाणी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पेंदा (नागढव) 

येथील एकल परिवाराच्या महिलानी  सहभाग नोंदवीला व त्यांच्या सुगंधी उटणे व होळीच्या रंगाला अनुसरुन पुरस्कार मिळला

 उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे  हस्ते कु.छाया शामराव कागणे या एकल विद्यालयाच्या कार्यकत्याचा गौरव करण्यात आला