Ticker

6/recent/ticker-posts

मोफत आरोग्य तपासणी व फराळ " कष्टकरी महिलांना किनवट पोलिसांची अनोखी भाऊबीज ओवाळणी भेट



" मोफत आरोग्य तपासणी व फराळ " कष्टकरी महिलांना किनवट पोलिसांची अनोखी भाऊबीज ओवाळणी भेट

किनवट  ना सणवार, ना आराम, सांज-सकाळ नियमीत काम, 

 अशा दैनंदिन रहाटगाडग्यात पोटाची खळगी 

भरण्यासाठी सदैव धडपडणाऱ्या कष्टकरी महिलांना दिवाळी निमित्त पोलिस स्टेशन मध्ये 

बोलावून " त्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना फराळ देऊन "

 किनवट पोलिसांनी भाऊबीजे निमित्त अनोखी ओवाळणी भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
     

     शहरातील कचरा वेचणाऱ्या सर्व महिला, नगर पालिका महिला सफाई कामगार, घिसडीकाम करणाऱ्या महिला व घरकाम करणाऱ्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी व फराळ थेट कार्यक्रम

 हिवाळी निमित्त येथील ठाण्यात किनवट पोलिसांनी आयोजित केला होता. 

या कार्यक्रमाचे संकल्पक उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठस्तरीय समन्वय कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पंजाब शेरे, प्रा.डॉ. वसंत राठोड, 

गृहलक्ष्मी महिला संस्थेच्या संगीता पाटील, ऋचिता फुलझेले, सामाजिक कार्यकर्त्या इंदुबाई कनाके उपस्थित होते.
  

        कार्यक्रमाचे आयोजक पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी प्रास्ताविक केले. 

उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

 सहायक पोलिस निरीक्षक रविकुमार भोळ यांनी आभार मानले. 

प्रारंभी अन्वी क्लिनिकल पॅथॉलॉजीचे लॅब टेक्निशिअन प्रेम जाधव व अमन जाधव यांनी मोफत आरोग्य तपासणी साठी रक्तनमुने घेतले. 

त्यानंतर संगीता पाटील यांनी प्रेरणादाई गीत सादर करून महिलांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. 

यावेळी घरकाम करणाऱ्या महिलांच्या वतीने शोभा येरेकार, श्रमिक महिलांपैकी संघमित्रा डुमने, 

पालिका महिला सफाई कामगारांपैकी शांताबाई दमकोंडवार, कचरा वेचक महिलांपैकी कमलाबाई यांनी मनोगत व्यक्त केले. 

त्यानंतर प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन केले.
      

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, एएसआय चाँद, जमादार पांडुरंग बोंडलेवाड, पांढरे, पोलीस कर्मचारी गजानन चौधरी, 

संदुपटलेवाड, कागणे, सिद्धीकी, परमेश्वर गाडेकर, 

रापतवार, आत्राम, कनाके, बोधमवाड, सुनील कोलबुधे, राजू पाटोदे, ज्ञानबा लोकरे, महिला पोलीस कर्मचारी शिवनंदा रायलवाड, शिंदे, अनिता गजलवार, 

कुऱ्हे, संदीप वानखेडे, सुरेश माने, नागनाथ जेठे, 

लक्ष्मण भालेराव, गंगाराम कनकावार, 

ज्योती पिलवार, संजीवनी मुनेश्वर आदींनी पुढाकार घेतला.

" दिवाळी निमित्त पोलिस ठाण्यात बोलावून वंचित उपेक्षित 

महिलांची आरोग्य तपासणी करून दिलेला फराळ म्हणजे आपल्या माहेरी आणून आम्हा दिलेली ही अनोखी भाऊबीज ओवाळणी आहे.

 इंदुबाई कानिंदे, सामाजिक कार्यकर्त्या, गोकुंदा (किनवट )

" पोलिस तुमचे भाऊ आहेत, पोलिस स्टेशन तुमचे माहेर आहे, 

असे समजून सर्व महिलांनी आपली सुख, दुःखे सांगावीत,

 आपल्यावरचा अन्याय असू दे किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटना, 

संशयास्पद हालचाली याची माहिती बिनधास्तपणे पोलिसांना द्यावी.


मंदार नाईक, उप विभागीय पोलिस अधिकारी, किनवट