Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या हेड खाली शेतकरयांना मंजूर केलेले अनुदानाचे पैसे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात जमा करुन


महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या हेड खाली शेतकरयांना मंजूर केलेले अनुदानाचे पैसे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात जमा करुन

 तेथील ग्राहक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले

 जातात परंतु त्यापैशाची उचल लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 

सहा सहा महिने करता येतनाही कारण तीथे Alfabatic पद्धतीने A ते Z अशा अनुक्रमांका नुसार गावची यादी लाउन टप्या टप्याने संथगतीने पैशाचे वाटप केले जाते.

कारण बँकेकडे कोणतीहीATM ची सुविधा उपलब्ध नाही आणि बँकेचे कुठेही ग्राहक सेवा केंद्र नाही तथा तेथील कर्मचारी वर्ग संगणक चालवन्यास प्रशिकषीत नाहीत.

एवढेच नाही तर सदरील NDC Bank ही प्रत्येक खातेधारकां कडून एक ते दोन हजार रुपये कपात करुन घेऊन बहुतांश शेतकऱ्यांना पासबुक पन देत नाही. आणि ज्यांच्या कडे पासबुक आहे

 त्यांना पासबुकवर Statment पन देत नाही.त्यामुळे कुनाच्या खात्यात किती रक्कम व व्याज जमा आहे याचा मेळलागत नाही. 
 आनखी असे की, 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा-किनवट चे खाते हे भारतीय स्टेट बँकेच्या शाखा किनवट येथे असुन शेतकऱ्यांना मिळणार्या अनुदानाच्या रक्कमे 

वरिल जमा झालेल्या व्याजाचा हिशोब शेतकऱ्यांना NDC बँकेच्या अधिका-यांनी अद्याप दिला गेला नाही त्यावर मीळनार्या व्याजा विषयी 

बँकेच्या अधिका-यांना व तालुका प्रशासनाला विचारले असता कुणाचीही बोलयाची तयारी नाही शेवटी हि व्याजाची रक्कम कुनाच्या घशात गेली याची ही चौकशी होणे गरजेचे आहे.
  

 असे असताना ही अगोदरच अडचणीत 
सापडलेल्या शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा अनुदान वाटपाचे काम वर्षानुवर्षे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये दिले आहे 

याचा परिणाम शेतकऱयांना वर्षानुवर्षे त्रास व अन्याय सहन करावा लागतो व ही बँक त्रूटिची सेवा देते.


  त्यामुळे शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली दिलेल्या अनुदानाच्या पैशाचा उपयोग  शेतकर्यांना वेळेवर होत नाही. 


  जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. व संबंधित तालुका तहसीलदार यांना 

सदरील अनुदानाची रक्कम ही राष्ट्रीय कृत बॅकेत शेतकरयांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याची विनंती वेळोवेळी  केली असता कसली ही दखल घेतली गेली नाही.
  तरी मा. 

मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी लाऊन कडक कारवाई करावी ही नम्र विनंती.
           -मुरलीधर मुंडे.
रा. मांडवा (कि).ता. किनवट. जि.नांदेड
        मो.9922984551