चोरीच्या गुन्ह्यात जेल भोगलेल्या माजी मुख्यमंत्र्याचा पोरगा,
विरोधक तुला चोरट्याचं पोरगं म्हणुनही हिनवत होते, पण तू खचला नाहीस,
डगमगला नाहीस, संघर्षाशी दोन हात केलेस अन लढत राहिलास व वयाच्या 31 व्या वर्षी स्वतःच्या जीवावर सत्तर पंच्याहत्तर आमदार निवडून आणलेस.
एकीकडं पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या सभांचा बिहारभर सुळसुळाट तर दुसरीकडं तू
एकट्यानं 250 च्या वर सभा घेऊन दवाई पढाई कमाई म्हणत लोकांची मनं जिंकलीस,
खरंच येणाऱ्या काळात राजकारणातला तू एक तेजस्वी, पराक्रमी, धुरंदर लोकनेता ठरलास...
जो जिता वही सिकंदर असेल पण...पण लढणारा तेजस्वी नक्कीच चमकेल आणि प्रेरणास्रोत असेल...
#तेजस्वी #यादव