Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे किनवट तालुक्याचे माजी शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा.किशनराव किनवटकर यांनी दिले


किनवट राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंतची शाळा २३ तारखे पासुन सुरु होत 

असुन संभाव्य धोका लक्षात घेता तुर्त शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात यावा अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, 

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे किनवट तालुक्याचे माजी शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा.किशनराव किनवटकर यांनी दिले आहे.
    

  पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या आर.टी.पी.सी.आर कोरोना चाचणीच्या तपासणीतुन ६०० च्या जवळपास शिक्षक बाधित 

आढळुन आल्याने शिक्षण विभाग खडाडुन जागे झाले आहे आज अनेक शिक्षण संस्थाकडे 

सुविधांचा अभाव आहे तीच परिस्थिती शासकीय शाळा व महाविद्यालयाची आहे तर अनेक शाळा व महाविद्यालयात स्वच्छालय नाही, 

मुतारी नाही विद्यार्थ्याला सामाजिक अंतर ठेउन बसवावे अशी जागा नाही, सॅनिटायझर चा वापर नाही अशा 

अनेक सुविधांचा अभाव त्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना ऍटो व स्कुल बस मध्ये प्रवास करावा लागतो त्यात एकप्रकारे कोंबुन शाळेत पाठवले 

जाते अशा स्थितीत एकही विद्यार्थ्यी कोरोना संक्रमीत निघालातर त्याचा फटका समाजाला झपाट्याने कोरोनाचा विळखा बसेल त्यामुळे शाळा सुरु करण्याआधी जो पर्यंत या 

आजारावरील लस उपलब्ध होत नाही तो पर्यंत शाळा कॉलेज उघण्यात शासनाने घाई करु नये अशी मागणी प्रा.किशनराव किनवटकर यांनी केली आहे.
  

    एक विद्यार्थ्यी बाधीत झाला तर त्याचा परिणाम त्याच्या संपुर्ण घरावर होतो तर शिक्षकच बाधित असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार 

हा संभाव्य धोका लक्षात घेऊन इयत्ता नववी ते बारावीचे सुरु होणारे वर्ग तत्काळ बंद करावे

 व पुढील निर्णय लस उपलब्ध झाल्यावरच करण्यात यावा अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, 

शिक्षणमंत्री यांच्याकडे प्रा.किनवटकर यांनी केली आहे.