*दिव्यांग बांधवांचा विद्रोही आंदोलन वरिष्ठांना रताळे दिव्यांग साहित्य भेट देण्यासाठी एकाचवेळी अनेक कार्यालयावर घोषणेनी नांदेड दणाणले*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांच्या ऐकुन एकोणीस प्रश्नाबाबत सर्व दिव्यांग संघटनेच्या वतीने कुंभकर्ण शासन प्रशासन जागे करण्यासाठी विद्रोही मोर्चा
दि २ नोव्हेंबर २०२० रोजी घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व आंदोलणाची सुरूवात
जिल्हा परिषद कार्यालयाकडे लेझीम/दांडिया आणि आक्रोश नारेबाजीच्या रूपात मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोर्चा समोर आले
असता राहुल साळवे व चंपतराव डाकोरे यांनी अनेक प्रश्नाबद्दल उतर मागितले असता प्रश्नाचे उतर देता आले नाही
दोन तास ठिय्या आंदोलन करत लेखी पत्र घेतल्या शिवाय गेट सोडण्यात आले नाही.या लेखी पत्रात असे सांगण्यात आले कि.एका महिन्यात संबंधित सर्व जिल्हा परिषद कार्यालयाकडून दिव्यांगांचे प्रलंबित
सर्व मागण्या निकाली काढण्यात येतील जो अधिकारी कर्तव्यात कसुर करेल त्यांच्यावर दिव्यांग सुधारीत कायदा २०१६ मधील कलम ८३ ते ९२ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.
त्यानंतर मोर्चात खिचडी वाटप करण्यात आली.
तदनंतर आक्रोश मोर्चेचे रूपांतर महानगरपालिका कार्यालयावर धडकला.महानगर पालिका अधिकारी मोर्चा समोर येऊन त्यावेळी डाकोरे यांनी अनेक प्रश्न विचारले असता त्यांना सुध्दा उतर देता आले नाही.
तेव्हा लेखी दिल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा संघटनेची घेतल्यामुळे लेखी उतर दिले.
तेव्हा नांदेड गुरुद्वारा साहेब यांच्या कडुन लंगर साहिब बंदाघाट कडुन शेकडो दिव्यांगांना लगर महाप्रसादाच्या माध्यमातून जेवण देण्यात आले.
त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणेने धडकला असता शिष्टमंडळ यांना जिल्हाधिकारी साहेब डॉ.विपीन ईटणकर
यांनी दिव्यांग शिष्टमंडळासह एकुण १९ मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करत १५ दिवसात संबंधित सर्व अधिकार्यांची बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
दिव्यांग शिष्टमंडळाकडुन एका महिन्यात जर आमच्या मागण्या निकाली काढण्यात आल्या नाहीत तर येत्या जागतीक दिव्यांग दिनी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांचा ताबा घेत खुर्च्या जप्त करणार असल्याचे सांगण्यात आले.
आजच्या या विद्रोही आंदोलनात बेरोजगार दिव्यांगाच्या प्रलंबित ५ टक्के अखर्चीत निधीसह दिव्यांग
कायदा १९९५ आणि सुधारीत कायदा २०२६ ची
अंमलबजावणी करणे.यासह रोजगारासाठी जागा.घरकुल.
अंत्योदय शिधापत्रिका.थकित निराधार मानधन.
अणुशेष भरती.मनरेगा अंतर्गत रोजगार.यासह ईतर मागण्या होत्या
आजच्या या आंदोलनात राहुल साळवे. चंपतराव डाकोरे.
अमरदिप गोधने.पअब्दुल माजीद,मनोज कोटकर,
ज्ञानेश्वर नवले, दिगंबर लोणे, गजानन हंबर्डे,
देविदास बद्देवाड.संतोष पवार पाटिल.
सुनील जाधव,नागनाथ कामजळगे फिरोज, कार्तिक भरतीपुरम.भोजराज शिंदे गणेश .
संजय धुलधाणी.हानिफ शेख, संगिता बामणे, अरूणा शिंदे, रामलु मोगरेवार, शंकर पांचाळ,विठल बेलकर ईत्यादी
हे आंदोलन सहभागी व यशस्वी करण्यासाठी दिव्याग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र,
दिव्यांग बेरोजगार कल्याणकृति संघर्ष समिती, संभाजी ब्रिगेड दिव्याग आघाडी नांदेड,
भाजपा दिव्यांग आघाडी नांदेड, दिव्यांग संघर्ष समिती हदगाव.मुकबधीर कर्णबधीर संघटणा
नांदेड.ब्लाईंड संघर्ष समिती नांदेड यांच्यासह हजारो दिव्यांग बांधव आणि भगीनी सहभागी झाले होते
असे प्रसिद्ध पञक दिव्यांग संघटनेनी प्रसिध्द केले.