*पैनगंगा अभयरण्यात पक्षी सप्ताह उत्साहात साजरा*
पैनगंगा अभयारण्य, पांढरकवडा वन्यजीव विभागाच्या कोरटा व खरबी वनपरिक्षेत्र
कार्यालयाच्या वतीने पक्षी सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले
शालेय विद्यार्थी करीता निबंध,
चित्रकला स्पर्धा, गावातील युवकासाठी व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच भारत जोडो युवा अकादमी च्या सहकार्याने
निसर्ग प्रेमीं साठी दि 11 नोव्हे रोजी पक्षी निरीक्षण सहलीचे आयोजन करण्यात आले होते
उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक,डॉ अशोक बेलखोडे यांच्या सह
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक हौशी छायाचित्रकार,नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटला
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वन महर्षी मारुती चितमपल्ली व पक्षी तज्ज्ञ डॉ सलीम अली यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून दि ५ ते १२ नोव्हेंबर पक्षी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला
त्या निमित्त विभागीय वनाधिकारी सुभाष पुराणिक यांच्या संकल्पनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विनायक खैरनार, व नितीन आटपाडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
आमडापुर तलाव,मोरचंडी जंगलात पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
विशेष दुर्बिणीतून पक्षी निरीक्षण करण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच वनस्पति व
वन्यजीवांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली प्रा डॉ अंबादास कांबळे
प्रा डॉ सुनील व्यवहारे, प्रा डॉ पंजाब शेरे ,प्रा डॉ वसंत राठोड, जि प शाळा कोरटा चे मुख्याध्यापक पेंटावार ,कला शिक्षक शिवराज बामणीकर, संतोष तांडूरकर,
हौशी वन्यजीव छायाचित्रकार प्रतिक राठोड ,संजय बोलेनवार कु आकांक्षा आळणे, ऋषिकेश सुरवसे ,चिन्मय कुलकर्णी अजिंख्य आळणे,
यांच्या सह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते
चिखली येथील वन विश्राम गृह येथे समारोप कार्यक्रमात
उपस्थितांच्या हस्ते स्पर्धेततील विजेत्यांना स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
वनरक्षक गुंडले,कुहिरे, वाठोरे, इखार यांच्या सह खरबी व कोरटा
वनपरिक्षेत्रातील कर्मचारी यांनी याउपकर्मात सहभाग नोंदवला अभयारण्य क्षेत्रातील
आढळणाऱ्या पक्षांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व माहिती चा कार्यक्रम लवकरच घेण्यात येणार आहे.