आज दिनांक 18/12/2020 रोजी इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे पुणे जिल्हा अधिकारी
कार्यालय समोर अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यास उदासीन राज्य सरकार आणि
जिल्हा प्रशासन विरूध्द "थट्टा डे "या नावाने आंदोलन करून पुणे जिल्हा अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, एन
ए पी एम चे समन्वयक इब्राहिम खान, सुभाष वारे सर, मानव कांबळे, फैय्याज शेख किशोर धमाले सचिन बगाडे, मजहर खान, जाकिर
नदाफ, राजु सय्यद, शानु पठाण, नासिर शेख, विना ताई कदम, पुणेशहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे साजिद शेख,
समाजसेवक अंकल सोनावणे, अँड अडसूळ ताई, काँ, साळवे आणि अन्य पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.