औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात 67. 25 टक्के मतदान
किनवट औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात
एकूण दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के मतदान झाले असून
ही निवडणूक पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे पार पडली असल्याची माहिती
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, यांनी दिली.
किनवट तालुक्यात 2447 पुरुष, 689 स्त्री असे एकूण 3136 मतदार आहेत. यापैकी 1734 पुरुष, 375 स्त्री व एकूण 2109 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्र निहाय झालेले मतदान कंसात एकूण मतदार :
मतदान केंद्र क्रमांक 411 किनवट शहर -1 : पुरुष 448(624), स्त्री 120 (225 ) व एकूण 568 (849) टक्के 66. 90, म.कें क्र.412 किनवट ग्रामीण) : पुरुष 472 ( 647), स्त्री 128 (248) व एकूण 600 (895), म. कें.क्र.413 इस्लापूर : पुरुष 155 (241), स्त्री 21 (35), एकूण 176 (276) टक्के 63.77, म.कें. क्र.414 मांडवी : पुरुष 119 (154), स्त्री 20(27) व एकूण 139 (181) टक्के 76.80, म.कें. क्र. 415 बोधडी (बु ) : पुरुष 209 (294), स्त्री 33 ( 64) व एकूण 242 (358 ) टक्के 67.60, म. कें. क्र. 416 सिंदगी (मो ) : पुरुष 50 (90), स्त्री 14 (18) व एकूण 64 (108 ) टक्के 59.26, म. कें. क्र. 417 दहेली : पुरुष 84 (111), स्त्री 13 (19) व एकूण 97 (130 ) टक्के 74.62, म. कें. क्र. 418 उमरी (बा ): पुरुष 47 (66), स्त्री 8 (18) व एकूण 55 (84 ) टक्के 65.48, म. कें. क्र. 419 जलधरा : पुरुष 104 (149), स्त्री 12 (24) व एकूण 73 (116) टक्के 67.05, म. कें. क्र. 420 शिवणी : पुरुष 46 (71), स्त्री 6(11) व एकूण 52 (82 ) टक्के 63.41,
10 मतदान केंद्रासाठी 12 मतदान केंद्राध्यक्ष, 36 मतदान अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचारी व 4 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती .
तहसीलदार उत्तम कागणे, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, मोहम्मद रफीक, अनिता कोलगणे,
मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, स्वामी मल्लिकार्जुन, राम बुसमवार यांनी मतदान प्रक्रिया यशस्वी करण्याचे सुव्यवस्थित नियोजन केले होते.
उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती थोरात
यांच्या नेतृत्वात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटील, पी.पी. सूर्यवंशी, एस.बी.सरनाईक, गोविंद पांपटवार, एम. एम. कांबळे, टोम्पे, नितीन शिंदे
आदि तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.