Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माझ्या हस्ते उत्साहात पार पडले किनवट, धर्माबाद व बिलोली भागात


हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माझ्या हस्ते उत्साहात पार पडले किनवट, 

धर्माबाद व बिलोली भागात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते परंतु त्याची खरेदी शासन स्तरावरून होत 

नसल्याने खासगीे बाजारपेठेत शेतकर्‍यांची नुकसान होत होते ही बाब राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व

 राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री मा.ना.छगन भुजबळ यांच्या समवेत बैठक घेऊन पाठपुरावा केला त्याला आज यश प्राप्त झाले. 
   
  
   आज किनवट येथे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधानासह धान खरेदी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.  यावेळी माझ्या समवेत 


जि. प. सदस्य सूर्यकांत आरंडकर, भगवान हुर्दुके ,पं. स.उपसभापती कपिल कऱ्हेवाड 

बालाजी आल्लेवार आदिवासी विकास महामंडळ संचालिका मीनाक्षी वेट्टी ,व्यवहारे मॅडम, पं.स. सदस्य निळकंठ कातले , 

मारोती माहूरकर संदीप केंद्रे ,आदिवासी विकास महामंडळाचे बरकमकर गजानन बच्चेवार , काशिनाथ शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.