बिलोली येथील दिव्यांग मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना जलदगती न्यायालयात खटला चालून फाशीची शिक्षा
देण्यात यावी व दिव्यांग मुलीचे पालन पोषण करणाऱ्या कुटुंबांना 25 लाखाची तात्काळ मदत जाहीर करावी. असे निवेदन अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने मा सहाय्यक
जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट यांच्यामार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना देण्यात आले आहे.
बिलोली येथे झोपडपट्टीमध्ये साठे नगर भागात राहणारी दिव्यांग मुलगी दिनांक 09/12/2020
रोजी सायंकाळी स्वच्छालयास गेली असता तिच्यावर काही नराधमांनीति ला दगडाने ठेचून मरेपर्यंत मारण्यात आले.
महाराष्ट्रामध्ये आबलावार दिव्यांगावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढत असून एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची
ओळख संपूर्ण भारतामध्ये असताना व शिवशाहीचे सरकार महाराष्ट्रात असताना अशा घटना जाणीवपूर्वक होत असल्याचे दिसून येत आहे.
तरी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपणास संघटनेच्या वतीने सदर निवेदन देऊन विनंती
करण्यात येते की बलात्कार करून हत्या करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
तसेच मृत दिव्यांगाचे पालन पोषण करणाऱ्या कुटुंबाला 7 दिवसात 25 लक्ष रुपये मदत जाहीर करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे
त्यावेळेस उपस्थित अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे तालुका सचिव राज माहूकर व शहराध्यक्ष सलाम बागवान, संघटना अध्यक्ष
गजानन कोतपेल्लीवार, संघटना उपाध्यक्ष अनिल दोराटे, पद्माकर मैंद , लक्ष्मण बटलवार, संतोष खाडे, यमुना ताई केंद्रे इत्यादी उपस्थित होते.