भूखंड माफियांकडून नगर पालिकेच्या आरक्षित व मोकळ्या जागेवर होणारे अतिक्रमण थांबवून पालिकेने आपली जागा आपल्या ताब्यात घ्यावी ; नगरसेविका अनुसया मधुकर अन्नेलवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
किनवट (तालुका प्रतिनिधी ) : किनवट नगर परिषदेच्या मालकी व आरक्षित जागेवर भूखंड माफियांकडून होणारे अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम त्वरीत थांबवून,
नगर परिषदेने आपली जागा आपल्या ताब्यात घ्यावी, अतिक्रमण करणारांवर कार्यवाही करावी व नगर विकास आराखड्या अंतर्गत आरक्षण, त्याचा वापर, नियोजन आणि मंजूर भूखंडामधील खुले क्षेत्र कोणत्या प्रयोजनासाठी वापरतात याची माहिती
मिळणे व प्रशासनास याची सूचना देवूनही प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत कार्यवाही करणे बाबतचे निवेदन नगरसेविका अनुसया मधुकर अन्नेलवार यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी यांना दिल्याने शहरात खळबळ माजली आहे.
प्रभाग क्रमांक 2 साठेनगरच्या नगरसेविका अनुसया मधुकर अन्नेलवार यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी यांना पाठवावयाचे
निवेदन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांना दिले. या निवेदनात असे नमूद केले की, किनवट शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या अनेक ठिकाणी
मोकळ्या जागा असून अशा मोकळ्या जागा सुरूवातीला काही व्यक्ती नगर परिषदेकडून भाड्याने घेऊन ताबा घेतात व नंतर नगर परिषदेस भाडेही देत नाहीत.
या शिवाय काही मोकळ्या जागेवर काही पदाधिकाऱ्यांनी स्वत: अतिक्रमण करून यावर अनाधिकृत बांधकाम केल्याने याचा फायदा सामान्य व्यक्तीही घेतात.
असे प्रकार दिवसेंदिवस घडत असून नगर परिषदेच्या जागेवरील अतिक्रमणांची संख्या वाढत आहे.
हे असेच चालू राहिल्यास भविष्यात नगर परिषद मालकीची एकही जागा नगर परिषदेच्या उपयोगाकरीता शिल्लक राहणार नाही.
नगर परिषदेने संपादन केलेली जागा व नगर परिषद स्थापनेवेळी नगर परिषदेस मिळालेली सर्व मोकळी जागा,
इमारती इत्यादी अशा सर्व जागा एक एक करून पदाधिकारी यांचे मार्फत संपविण्यात येत आहेत. या शिवाय नगर परिषदेने मंजूर केलेल्या नगर परिषदेचे व खाजगी
अभिन्यासातील सर्व मोकळ्या जागेवर अतिक्रमण होऊन अनाधिकृत बांधकामे झालेली आहेत. हे सर्व नगर परिषद प्रशासनातील माजी व आजी पदाधिकारी यांनी मिळून केलेले
सामाईक अतिक्रमण आहे.
अशा चालू असलेल्या अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत शहरातील काही व्यक्तींनी आपणासह वरीष्ठांकडे
बरेचवेळा तक्रार दिलेली आहे व अशा प्राप्त तक्रारी प्रमाणे वरीष्ठ कार्यालयाकडून व न्यायालयाकडून सूचना होऊन ही नगर परिषद प्रशासन त्यांचे विरूध्द कार्यवाही करण्यास असमर्थ ठरत आहे. असेही निवेदनात त्यांनी नमूद केले आहे .
नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नगर परिषद हद्दीतील नगर परिषदेच्या मालकीच्या सर्व मोकळ्या जागांचा शोध घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यास नगर परिषदेने जून 2019 मध्ये सर्व साधारण सभेत ठराव पारित केला आहे.
परंतु आज दीड वर्ष होऊही मुख्याधिकारी यांचेकडून याची अंमलबजावणी झालेली नाही.
तसेच किनवट नगर परिषदेद्वारे मंजूर केलेले व नगर विकास आराखडा अंतर्गतचे आरक्षण व त्याचे नियोजन, वापर, वापरात बदल केलेल्या कामांची माहिती मिळावी.
तसेच नगर परिषदेमार्फत किती वकोणत्या सर्वे नंबरला अकृषिक परवानगी देण्यात आलेली आहे.
तसेच मंजूर भूखंडामधील खुले क्षेत्र नगर परिषद याचे कार्यवाहीस्तव आहेत
त्याचा वापर कोणत्या प्रयोजनासाठी करतात त्यांच्या संचिकानिहाय माहिती मिळावी.नगर परिषदेच्या मालकीच्या व न.प.ने खरेदी केलेल्या
सर्व जागांचा शोध घेऊन त्यावरील सर्व
अतिक्रमण केलेल्या जागा ताब्यात घेण्यास मुख्याधिकारी यांना आदेशित करावे,
तसेच या कामी जाणून बुजून कुचराई करणारा विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी अशी विनंतीही नगरसेविका श्रीमती अन्नेलवार यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती त्यांनी विभागीय आयुक्त, औरंगाबाद,तहसीलदार,मुख्याधिकारी, नगर परिषद, किनवट यांना सुद्धा पाठविल्या आहेत.