वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केले खासदार हेमंत पाटील यांचे अभिष्टचिंतन
------------------------------------------------------
किनवट/माहूर: महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून पुढील काळात आपणांकडून
लोकसभा सदस्य नात्याने देशसेवा घडो आणि मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयन्त राहा अश्या शुभेच्छा दिल्या.
खासदार हेमंत पाटील यांचे हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते .
संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे.
या सर्वांची दखल घेऊन देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून आपण आजवर राष्ट्राच्या उन्नतीसाठी कर्तव्याचे पालन करून मोलाचे योगदान दिले असून पुढील
काळातही आपल्याकडून नाव भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल जोमदार व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
आणि आपणांस निरोगी आयुष्य लाभावे असेही पाठविलेल्या शुभेच्छा दिल्या.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मतदार संघातून आप्तस्वकीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
मोठ्या प्रमाणात रक्तदान ,अन्नधान , आरोग्य शिबीर, गरजूना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला .
खासदार हेमंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून राष्ट्राप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण मतदार संघात आयोजित केलेल्या
रक्तदान शिबिरात २१९० रक्तदात्यानी रक्तदान करून उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
हे सर्व होत असताना देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती आणि कार्यकारी प्रमुख पंतप्रधान यांच्याकडून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन होणे हे विशेष आहे .