Ticker

6/recent/ticker-posts

ईमानदारी की मिसाल सुभान सर ने निभाई है बैंक के ज्यादा पैसे आए वाले वापस किए

 Nasir Tagale: 

किनवट येथील उर्दू शाळेमध्ये शिक्षक असलेल्या सुबहान चव्हाण यांनी  बँकेला परत करून इमानदारीचा आदर्श घालून दिला आहे.

सुभान चव्हाणांच्या या प्रामाणिकपणाचे बँक कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून कौतुक होत आहे.
 

झाले  असे की किनवट येथे उर्दु शाळेमध्ये शिक्षक  असलेले सुबहान चव्हाण यांचे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. 


दिनांक 18 डिसेंबर रोजी त्यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे ते आपल्या खात्यातील 3 लाख 40 हजार रुपये उचल करण्यासाठी बँकेत गेले.

 तेथे पैसे उचलण्याची स्लिप भरून दाखल केली 

असता संबंधित कर्मचाऱ्याने नजरचुकीने 340000 रक्कमे ऐवजी 3 लाख 80 हजार रुपये सुबहान चव्हाण यांच्या हातात दिले.

 रक्कम मोठी असल्यामुळे चव्हाण यांनी मोजणी न करता पूर्ण रक्कम बॅगमध्ये टाकून घरी परतले

 घरी आल्यानंतर पैशाची बॅग जशीच्या तशी कपाटात ठेवून ते नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी  बाहेरगावी गेले. 

कार्यक्रम आटोपून रविवारी घरी परतल्यानंतर त्यांनी बँकेतून उचललेल्या पैशाची मोजणी केली असता 40 हजार रुपयाची रक्कम 

अधिक आल्याचे त्यांच्या लक्षात आले परंतु 40 हजार रु जास्त आले म्हणून उल्हासित न होता सुबहाण चव्हाण यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडिया गाठून तेथे बँक मॅनेजर भेट घेतली 

व घडलेला सर्व प्रकार सांगून अधिक आलेले 40 हजार रुपये बँक मॅनेजरला साभार परत 

केल्यानंतर चौहान यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पैसे बघितल्यानंतर बऱ्याचदा इमानदारीने वागणाऱ्या व प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या 

माणसाची सुद्धा नियत बिघडत असते याचा आपण नेहमीच अनुभव घेतो परंतु सुबहान चव्हाण सारखी  प्रामाणिक माणसे कशीही 

परिस्थिती असली तरी आपला प्रामाणिकपणा कायम ठेवून लबाड्याना इमानदारीचा आदर्श घालून देत असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने  आला आहे