" माझी ऊर्जा सौ. जयश्री पाटील "
आज सौ. जयश्री आणि माझ्या लग्नाला ४१ वर्षे झाली. माझ्या मागच्या सात पिढ्यात कुणी ग्राम पंचायत चे सदस्य ही नव्हते. माझ्या राजकारण व समाज सेवेची सुरुवात १९७१ च्या मध्यावधी लोकसभेच्या निवडणुकीपासून झाली.
१८ विश्व दारिद्य्र घरात सुखासमाधानाने नांदत असतानाही समाजकारण व राजकारण याकडे माझा ओढा होता. त्याचा मला नाद लागला. माझी राजकारणाची सुरुवात स्वबळावर व स्वकष्टावर झाली.
काम नाही, नोकरी नाही ती करायचीही नाही असे ठरवलेल्या माझ्यासारख्या फाकिराच्या पदरात श्री एकनाथराव पवारांनी आपली सुख लोलुप मुलगी सौ. जयश्री टाकली. दाद दिली पाहिजे त्या माणसाच्या धाडसाला.
सर्व अडचणींवर मात करून मी राजकारणात पुढे पुढे सरकत गेलो आणि मोठ झालो त्याचे सारे श्रेय सौ जयश्री पाटील हीस आहे.
रोजचे मोर्चे, धरणे, आंदोलने पोलिसाचा सिसेमारा पण त्या अनंत अडचणी स्वीकारून ती पूर्णतः माझ्या कार्यात विरघळून गेली. तिची कधीही तक्रार नाही, तिने कधी काही मागणी केली नाही. रात्रंदिवस राबराब राबून तीने मुला बाळाना सांभाळून मला फार मोठी साथ दिली.
अतिशय संयमी शांत आणि कमालीची सहनशीलता असलेल्या सौ. जयश्री च्या साथी शिवाय हे शक्य नव्हते.
ती नेहमी म्हणते तुम्ही समाजाचे काम करा मी घर सांभाळते. आज पर्यंत तिने ते खरे करून दाखवले आहे. मी तिचा खूप खूप आभारी आहे.
जवळपास १८ वर्षे(दीड तप) सतत कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर मला १९९० साली मराठवाडा पदवीधर बिनविरोध सोडायची नाही म्हणून उमेदवारी मिळाली पण मी निवडून आलो. या सर्व भयानक आर्थिक संकटात सौ. जयश्री ही सावली सारखी माझे सोबत राहिली. तिने मला कमालीची हिम्मत दिली.
ईश्वर आम्हा दोघांनाही दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो कारण ही तर अजून सुरुवात आहे. अजून समाजासाठी खूप काही करावयाचे आहे.
पुनर्जन्म वगेरे मी मानत नाही परंतु तो असलाच तर पुढचे सात जन्म मला जयश्री च पत्नी मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.