Ticker

6/recent/ticker-posts

हाजी शरफोद्दीन कमरोदीन बडगुजर यांचे निधन रविवारी ( दि.२७) रोजी रात्री ७.३० वाजता अंत्यसंस्कार



हाजी शरफोद्दीन कमरोदीन बडगुजर यांचे निधन  रविवारी ( दि.२७) रोजी रात्री ७.३० वाजता अंत्यसंस्कार

किनवट येथील प्रतिष्ठित नागरिक हाजी शरफोद्दीन कमरोद्दीन बडगुजर 

( वय ७० वर्षे ) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने रविवार (दि. २७ डिसेंबर ) रोजी दुपारी १.१५ वाजता निधन झाले.

 त्यांचे पश्चात तीन मुलगे, दोन मुली नातू  पणतू असा मोठा परिवार आहे.

 त्यांचे पार्थिवावर मोमीनपुरा येथील स्मशानभूमीत

 रविवार ( दि. २७ ) रोजी रात्री ७.३० वाजता नमाजे इशनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

त्यांनी दोन वेळा हज व एक वेळा उमरा यात्रा केली होती.

 ते अत्यंत मनमिळावू व परोपकारी स्वभावाचे होते. त्यांना वाचनाचा छंद होता. 

दररोज रात्री तीन - चार वृत्तपत्रे वाचल्याशिवाय ते झोपत नसत.
        

   दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी शकील बडगुजर, सा. लोकादेशचे संपादक साजिद बडगुजर व फकरोद्दीन बडगुजर यांचे ते वडील होत.