Ticker

6/recent/ticker-posts

३ जानेवारी रोजी माजी मुख्याध्यापक रामजी कांबळे गुरुजी यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन


३ जानेवारी रोजी माजी मुख्याध्यापक रामजी कांबळे गुरुजी यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन


 किनवट / तालुका प्रतिनिधी : येथील बहुजन चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते तथा माजी 


मुख्याध्यापक रामजी कांबळे गुरुजी यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन स्त्री शिक्षणाच्या जनक 

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती " महिला शिक्षण दिन " रविवार

 (दि. ३ जानेवारी ) रोजी सकाळी ११.३० वाजता महात्मा ज्योबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा येथील मातोश्री कमलताई ठमके सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास सर्व साहित्य प्रेमिंनी बहुसंख्येनं उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
            

    भारतीय बौध्द महासभेचे  तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील तर   अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राष्ट्रीय 

सरचिटणीस तथा कौशल्य प्रकाशन औरंगाबादचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड, गझलकार मधु 

बावलकर (अदिलाबाद), अभि. भीमराव हटकर ( साहित्यिक नांदेड) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
                  

        प्रारंभी आदिजन संस्था संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमी प्रस्तुत प्राचार्य सुरेश पाटील 

प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे व संच यांचा 'बुद्धभीमवाणी' प्रबोधन गीतांचा कार्यक्रम  होणार आहे.
                                  


     या कार्यक्रमास साहित्य तथा बहुजन व धम्म चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी 

 उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस प्रा.डॉ. अंबादास कांबळे, 

सेक्युलर मुव्हमेंट नांदेडचे  जिल्हा संघटक ॲड. मिलिंद सर्पे, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन नांदेडचे जिल्हा कार्याध्यक्ष  उत्तम कानिंदे, 

भारतीय बौद्ध महासभेचे  तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे व  क्रांतिसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी केले आहे.
        

      किनवटमाहूर तालुक्यात कांशीरामजी यांचे डीएसफोर, बहुजन चळवळ रुजविणारे,

 भारतीय बौद्ध महासभेचे माजी कार्यकर्ते, १२ वर्षे बौद्ध भिक्खू म्हणून कार्य केलेले 

कॉस्मॉपॉलिटन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामजी कांबळे गुरुजी यांच्या शिलगंध, निसर्ग, आतंक, 

विप्लव व जीवन का चलचक्र या पाच कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

 कांबळेगुरूजीवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी  जास्तीत जास्त संख्येंनी उपस्थित राहावे, 

असे आवाहन आयोजकांनी केले आहे.